file photo 
मराठवाडा

बोराळा हादरले : तीन दिवसांत तीन शेतकरी युवकांची आत्महत्या 

राजेश दारव्हेकर

हिंगोली : वसमत तालुक्यातील बोराळा येथे सलग तीन दिवसात तीन तरुणांनी वेगवेगळ्या कारणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. यापैकी दोन घटनांची नोंद वसमत येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तिघांपैकी एक विवाहित तर दोन अविवाहित आहेत.

जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या सोयाबीन काढणी सुरू आहे. मात्र संततधार पावसाने त्यात व्यत्यय येत आहे. या कारणामुळे शेतकरी चिंतेत आहेत. बँकेचे कर्ज कसे फेडावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच विवंचनेतून बोराळा (ता. वसमत) येथील प्रभाकर जाधव (वय ३२) यांनी राहत्या घरी शुक्रवारी (ता. नऊ) सायंकाळी सहा वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील असा परिवार आहे.

दुसरी घटना

तर याच गावातील दुसऱ्या घटनेत संतोष बालाजी खराटे (वय २२) याने शनिवारी (ता. दहा) दुपारी चार वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान धमक्यांच्या त्रासाला कंटाळून संतोषने आत्महत्या केली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संतोषच्या आईच्या फिर्यादीवरुन वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अविवाहित आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे.

तिसरी घटना

बोराळा गावातील तिसरी घटना ही रविवारी (ता. ११) सायंकाळी उशिरा घडली आहे. या घटनेत राजू गंगातीरे यांनी गावा शेजारील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा तरुण देखील अविवाहित आहे. याच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे.

आत्महत्या करणारे तीनही तरुण शेतकरी कुटुंबातील

राजू याचा मृतदेह वसमत येथील रुग्णालयात ठेवण्यात आला असून, त्याचे शवविच्छेदनानंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आत्महत्या करणारे तीनही तरुण शेतकरी कुटुंबातील आहेत. तसेच ते कुटुंबातील प्रमुख होते. या तरुणांच्या आत्महत्येने कुटुंबासह गावावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. त्यांच्या आत्महत्येची चर्चा गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Emotional Message : राहुल गांधी भावूक; वडिलांची आठवण काढत आई सोनिया गांधींसाठी खास संदेश

ZODIAC SIGNS: राग आला तरी लगेच शांत होतात! ‘या’ राशीनच्या मुली असतात मनाने खूप हळव्या; ओळखा स्वभाव!

Kas Plateau Flower Season 2026 : कास पठारावरील फुलांचा हंगाम 'या' तारखेपासून होणार सुरू; ऑनलाईन बुकिंग कधी? हुल्लडबाजी करणाऱ्यांना बसणार चाप

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी केली पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी

Ayushman Card : कोणताही प्रीमियम न भरता मिळवा फ्री Health Insurance, फक्त WhatsApp वर ‘Hi’ ... जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

SCROLL FOR NEXT