jail-full_1436353919.jpg 
मराठवाडा

शंकरनगरच्या ‘त्या’ प्रकरणातील फरारी आरोपीला अटक

सकाळ वृत्तसेवा


बिलोली, (जि. नांदेड) ः शंकरनगर (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी दयानंद राजुळे याला रामतीर्थ पोलिसांनी सोमवारी (ता. दहा) पहाटे लातूरमध्ये अटक करून जेरबंद केले. या प्रकरणातील दोन मुख्य आरोपीसह सह आरोपींना अटक करण्यात आली आहे.


शंकरनगर येथील श्री साईबाबा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील सहाव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडल्यामुळे या प्रकरणाचे जिल्ह्यासह राज्यभर पडसाद उमटले होते. यातील मुख्य आरोपी सय्यद रसुल व दयानंद राजुळे यांच्यासह प्राचार्य धनंजय शेळके व मुख्याध्यापक प्रदीप पाटील आणि एक स्वयंपाकीन महिलेविरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सदर घटना दोन महिन्यापूर्वी घडली असल्यामुळे या प्रकरणी संस्था चालकासह मुख्याध्यापकांनी आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून विविध संघटनांनी व पीडित मुलीच्या नातेवाईकांनी प्रशासनावर दबाव आणून या घटनेतील आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने बिलोली, देगलूर, नायगाव, नांदेड आदी ठिकाणी रास्ता रोको करून मोर्चे काढण्यात आले होते.

हेही वाचा -  रागाच्या भरात जुन्या प्रेयसीला संपवणारा प्रियकर ताब्यात !
रामतीर्थ पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी सय्यद रसुल यास तत्काळ अटक केली. त्यानंतर सहआरोपी असलेले प्राचार्य धनंजय शेळके व मुख्याध्यापक प्रदीप पाटील यांना पूर्णा येथून (ता.२६) जानेवारी रोजी ताब्यात घेतले. या तीन आरोपींना दहा दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास अहमदपूरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. अटक झालेल्या तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून यातील मुख्य आरोपी असलेला दयानंद राजुळे फरार असल्याने कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र, रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांनी सोमवारी (ता. दहा) पहाटेच्या सुमारास राजुळे यास लातूर येथून ताब्यात घेतले. या प्रकरणातील महिला आरोपी यांना पोलिसांनी अद्याप ताब्यात घेतलेले नाही. पोलिसांनी अटक केलेल्या दयानंद राजुळे याला आज (ता.११) बिलोली येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उमरासाठी जायचंय! दोनदा विमान रद्द झालं, पण आज जाणारच; तरुणाचा VIDEO व्हायरल

Yermala Crime : चोराखळी येथे कालिका सांस्कृतिक कलाकेंद्र चालकाच्या घरी सशस्त्र दरोडा; पिस्तूल–सुरे दाखवून ९.५१ लाखांचा मुद्देमाल लंपास

Crime News : तरूणपणी केला गुन्हा, म्हातारपणी झाली अटक; पोलिसांच्या जाळ्यात ३० वर्षांनतर असा अडकला फरार आरोपी

Nashik Municipal Budget : नाशिक मनपाचे ३०११ कोटींचे 'सिंहस्थ' बजेट सादर; करवाढ नाही, पण जाहिरात महागली!

Phulambri News : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT