corona new.
corona new. 
मराठवाडा

जालन्यात कोरोनाचा उद्रेक! २४ तासांत चारशे नव्या रूग्णांची भर; जिल्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर

उमेश वाघमारे

जालना: जिल्ह्यात कोरोनाचा महाउद्रेक झाला असून शनिवारी (ता.१३)एकाच दिवसात तब्बल चारशे कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे एकट्या जालना शहरात तब्बल २७७ कोरोनाचे नवे रूग्ण निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे जालना शहर कोरोनाचे हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू ही झाला आहे. दरम्यान शनिवारी ३६८ कोरोनाचे रूग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या एक हजार ३३० कोरोना सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात मागील महिन्यापासून कोरोना संसर्ग वेगाने वाढू लागला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून ही कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. शनिवारी (ता.१३) जिल्हा प्रशासनाकडून आरटीपीआर तर ॲंटीजेन तपासणीव्दारे तब्बल तीन हजार ४६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी चारशे नवीन कोरोना रूग्ण आढळून आले आहे. यात एकट्या जालना शहरामध्ये तब्बल २७७ नवीन कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जालना शहराची वाटचाल  हळूहळू कोरोना हॉटस्पॉटच्या दिशेने सुरू झाल्याचे चित्र आहे.

दरम्यान जालना तालुक्यातील वझर सराटे येथील सहा, रोषणगाव येथील चार, चितळी पुतळी येथील तीन, रामनगर साखर कारखाना येथील दोन, सारवाडी, निरगाव, नेर, हिसवन, बाजी उम्रद, शिवनी, कडवंची, मौजपुरी, नंदापूर, हिवरा, सावंगी, निरखेडा, भिलपुरी येथील प्रत्येकी एक, मंठा शहरातील चार, तालुक्यातील पांढुरणा येथील एक, परतूर शहरातील दोन, तालुक्यातील दैठाण खु., येथील तीन, आष्टी, दैठणा, सिृष्टी येथील प्रत्येकी दोन, घनसावंगी शहरातील आठ, तालुक्यातील  कुंभार पिंपळगाव, गुरूपिंप्री, बोलेगाव, रांजणी, शिवनगाव येथील प्रत्येकी एक, बदनापूर शहरातील दोन, तालुक्यातील तुपेवाडी येथील दोन, राजेवाडी, काजळा, वाकुळणी, ढासला, धोपटेश्‍वर येथील प्रत्येकी एक, अंबड तालुक्यातील पाथरवाल येथील दोन, खडेकश्‍वर, भालगाव, चिकनगाव येथील प्रत्येकी एक, जाफराबाद शहरातील एक

तालुक्यातील टेभूर्णी येथील दोन, खासगाव, नलविहीरा, सवासनी येथील प्रत्येकी एक, भोकरदन शहरातील सात, तालुक्यातील तपोवन येथील तीन, अन्वा, दानापुर येथील प्रत्येकी दोन, चिंचोळी, जवखेडा ठोंबरे, केदारखेडा, नळणी, पिंपळगाव, राजूर येथील प्रत्येकी एक व इतर जिल्ह्यातील बुलडाणा येथील २६ तर वाशिम येथील एक असे एकूण चारशे नविन कोरोनाचे रूग्ण आढळून आले. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात १८ हजार ६९ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत जिल्ह्यात ४१० जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. 

दरम्यान शनिवारी ३६८ रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत १६ हजार ३२९ रूग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यात एक हजार ३३० सक्रिय कोरोनाबधितांवर उपचार सुरू आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT