file photo 
मराठवाडा

निर्दयी घटना : पत्नीच्या उपचाराचा खर्च झेपावत नसल्याने आजारी पत्नीचा खून; पाथरी तालुक्यातील मुदगल येथील घटना, पती अटक

सकाळ वृत्तसेवा

पाथरी ( जिल्हा परभणी ) : आजारी पत्नीच्या गोळ्या- औषधीचा खर्च परवडत नसल्याने पतीनेच पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची घटना पाथरी तालुक्यातील मुदगल येथे ता. 13 मार्च रोजी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. दरम्यान या प्रकरणी रविवारी (ता. १४) पहाटे पाथरी पोलिस ठाण्यात आरोपी पतीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाथरी तालुक्यातील मुदगल येथील कमलाकर बाबासाहेब शिंदे यांची पत्नी कविता शिंदे हिला ब्रेन ट्युमर असल्याने त्यांचा गेल्या पाच वर्षांपासून शिर्डी येथील दवाखान्यात उपचार सुरु होता. कविता हिस सतत गोळ्या- औषधी लागत होते. त्यासाठी होणारा खर्च वाढत असल्याने व तो परवडत नसल्याने कंटाळून कमलाकर शिंदे यांनी पत्नी कवितांचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला.

हा प्रकार ( ता. १३ ) शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. रात्री आठ वाजता घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलिसांचे पथक मुदगलला दाखल झाले. या प्रकरणी कविताचे नातेवाईक सुरज मदनराव जामगे यांच्या फिर्यादीवरुन कमलाकर शिंदेविरुद्ध पाथरी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुपारी तीनच्या सुमारास आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण हे करीत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Green Card Rules Changes : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा भारतीयांना मोठा धक्का; ग्रीन कार्डसाठीचे नियम बदलले, आता मायदेशी परतावं लागणार...

Beed Encroachment: कचऱ्यात फेकली आजीची भाजी; अतिक्रमणविरोधी कारवाई, बीडमध्ये भाजीविक्रेत्या वृद्धेला अश्रू अनावर..

Marathi Live News update: भोंदूगिरीच्या आड काळ्या पैशांचा खेळ उघड, अशोक खरात प्रकरणात कोट्यवधींची जप्ती

Satara Rain: सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; वाई-जावळी परिसरातही मुसळधार पाऊस, वाहनधारकांची तारांबळ, रस्ते जलमय..

IAS अधिकाऱ्यांच्या मुलांना आरक्षण का द्यावे? सर्वोच्च न्यायालयाच्या वक्तव्याने चर्चा; OBC, SC-ST आणि EWS आरक्षणाचे नियम काय?

SCROLL FOR NEXT