rangpanchami 
मराठवाडा

‘कोरोना’च्या सावटातही धुलीवंदनाचा उत्साह

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्‍हाभरात मंगळवारी (ता.दहा) धुळवंडीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नैसर्गिक रंगासह कोरड्या रंगाचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. ‘कोरोना’च्या भीतीमुळे ज्येष्ठांनी धुळीवंडीपासून चार हात लांबच राहण्यास पंसती दिली. विविध तांड्यावर मात्र बंजारा समाज बांधवातर्फे पारंपरिक लेंगी नृत्य सादर करण्यात आले.

दरवर्षी धुळवंडीचा सण सर्वच स्तरातून साजरा केला जातो. यात बच्चे कपंनीचा सहभाग अधिक असतो. दरवर्षी पारंपरिक रंगाचा वापर करून धुलीवंदन साजरे केले जाते. या वर्षी मात्र जीवघेण्या कोरोना विषाणूची भिती सर्वत्र पसरली आहे. त्यामुळे बहुतांश जणानी धुळवंडीपासून लांब राहणेच पसंत केले. बच्चे कपंनीत मात्र धुळवंडीचा उत्‍साह कायम होता. या वेळी चीनमधून विक्रीस येणारे रंग, पिचकाऱ्या याकडे सर्वांनी पाठ फिरविली. नैसर्गिक रंगाचा वापर करीत कोरड्या रंगाना अधिक पसंती दिली.

बंजारा बांधवानी केली लेंगी गिते सादर

बंजारा समाज बांधवात होळीच्या सणाला आगळे वेगळे महत्‍व आहे. नोकरीनिमित्त बाहेर गावी असलेले समाजबांधव सणानिमित्त एकत्र येवून पारंपरिक लेंगी गिते सादर करून होळीचा सण साजरा करतात. औंढा नागनाथ तालुक्‍यातील गलांडी, दुधाळा व सावळी तांडा येथे बंजारा समाजबांधवातर्फे मंगळवारी पारंपरिक बंजारा वेशभूषेत महिलांनी हलगीच्या तालावर गोल फेर धरून लेंगी नृत्य सादर करत होळी व धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी कौशल्‍याबाई राठोड, वनिता राठोड, रमेश राठोड, बबन आडे, राजू जाधव, परमेश्वर पवार, सुभाष राठोड आदींचा सहभाग होता. दुधाळा व सावळी तांड्यावर दिवसभर कार्यक्रम घेण्यात आले.

औंढा शहरात बच्चे कपंनीचे धुलीवंदन

औंढा नागनाथ ः शहरात विविध प्रभागासह चौकाचौकात धुळवंड साजरी साजरी करण्यात आली. यात तरुणांसह बच्चेकंपनीत उत्साह मोठ्या प्रमाणावर होता. यामध्ये एकमेकांच्या अंगाला कोरडा रंग लावून सण साजरा करण्यात आला. या वर्षी कोरोना विषाणूच्या धास्तीने ओल्या रंगाचा वापर टाळण्यात आला. कोरड्या रंगाची उधळण करून धुळवंड साजरी करण्यात आली. शहरात पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

वसमत येथे गुलाब पुष्प देवून सत्‍कार

वसमत ः शहरात धुलीवंदन उत्साहात पार पडले. मात्र कोरोनाच्या भितीने अनेकांचे रंग उडाले. परीणामी रंग न खेळता घरी किंवा इतरत्र बसून उत्सव साजरा करण्यात आला. काहींनी तर चक्क मास्क लावून रंग खेळला. तळीरामावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. योगानंद महाविद्यालयाचे प्रा. डॉ. बाळासाहेब भिंगोले यांनी एक हजार गुलाबाची फुले खरेदी करुन रंगाऐवजी नागरिकांना गुलाबाचे फुल देवून सत्कार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

मी काही बोलत नाही, याचा अर्थ...! गौतम गंभीर संतापला; रोहित, विराटचा अप्रत्यक्ष उल्लेख, भारताच्या 'कसोटी' कामगिरीवर केले भाष्य

Baramati News : बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम; राज्य शासनाने घेतला निर्णय

मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

25 मार्चपासून 'या' राशींचा गोल्डन टाईम सुरू ! राजासारखं जगणार आयुष्य ; पैसा, गाडी, करियर सगळ्यात होणार प्रगती

SCROLL FOR NEXT