Jalna Accident News
Jalna Accident News esakal
मराठवाडा

जालन्यात भीषण अपघात; वडील अन् मुलगा जागीच ठार, पत्नी गंभीर जखमी

दीपक सोळंके

भोकरदन (जि.जालना) : उभ्या ट्रॅक्टरवर दुचाकी धडकून झालेल्या भीषण अपघातात पिता पुत्राचा जागीच मृत्यू, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना रविवारी (ता.१२) सकाळी ११ वाजेदरम्यान भोकरदन-जाफ्राबाद मुख्य रस्त्यावरील माहोरा गावानजीक असलेल्या म्हसरुळ पाटीजवळ घडली. शंकर भागचंद महेर ( वय ३५) व रोहन शंकर महेर (१०) असे या अपघातात मृत झालेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत. तर ममता शंकर महेर (३०) या गंभीर जखमी झाल्याने त्यांना औरंगाबाद (Aurangabad) येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. (Father And Son Died In Accident In Bhokardan Taluka Of Jalna)

या विषयी मिळालेली माहिती अशी की, भोकरदन (Bhokardan) तालुक्यातील ईब्राहिमपूर येथील शंकर महेर हे रविवारी सकाळी बहिणीच्या भेटीसाठी पासोडी या गावी दुचाकीने पत्नी व मुलासह निघाले होते. या दरम्यान भोकरदन जाफ्राबाद मुख्य रस्त्यावरील माहोरा गावानजीक असलेल्या म्हसरुळ पाटीजवळ उभ्या असलेल्या एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला त्यांची दुचाकी पाठीमागून धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, यात शंकर महेर व रोहन महेर या पिता-पुत्रांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील शंकर यांची पत्नी ममता बाजूला फेकल्या गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. मृत पिता-पुत्रांच्या उत्तरीय तपासणीसाठी त्यांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ममता यांना गंभीर मार असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या प्रकरणी जाफ्राबाद पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत आहे. (Jalna Accident News)

बहिणीच्या भेटीची इच्छा राहिली अपूर्ण

बऱ्याच दिवसांपासून बहिणीची भेट झाली नाही म्हणून, आपल्या पत्नी व मुलासह बहिणीच्या भेटीसाठी दुचाकीने तिच्या घरी जाण्यासाठी निघालेल्या ईब्राहिमपूर येथील महेर परिवारावर काळाने घाला घातला. यात पिता, पुत्र जागीच ठार व पत्नी गंभीर जखमी झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने ईब्राहिमपूर गावावर शोककळा पसरली आहे.

जखमी, मृत दोन तास पडून : माणुसकी हरवली..!

सध्या साेशल मीडियाची क्रेझ इतकी वाढली की, एखादा अपघातासारखा वाईट प्रसंग जरी घडला तरी काहीजण त्या अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी माणुसकी हरवलेले अनेकजण ती घटना कॅमेराबद्ध करण्यासाठी धडपड करतांना पाहायला मिळतात. प्रसंग गंभीर असाे की काेणताही, याचे भान कुणीच ठेवत नाही. असाच प्रसंग आज घडलेल्या या अपघातादरम्यान पाहायला मिळाला. या घटनेतील मृत व जखमी जवळपास दोन तास घटनास्थळी पडून होते. पिता, पुत्र तर जागीच ठार झाले होते. मात्र, जखमी असलेल्या त्या महिलेला मदत करण्याऐवजी अनेकजण केवळ फाेटाे व चित्रीकरण काढत हाेते. गंभीर महिला वेदनांनी विव्हळत हाेती. मदतीची याचना करीत होती. परंतू माणुसकी हरवलेल्यांना याचे काहीच दुःख नसल्याचे पाहायला मिळाल्याचे नंतर मदत करणाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT