accident accident
मराठवाडा

दुर्दैवी! बीडमध्ये कार-दुचाकीच्या अपघातात बाप-लेकाचा मृत्यू

तालुक्यातील शिंदी येथील सियाम हे त्यांचा मुलगा अमन व मुलगी मुस्कान यांना घेऊन सोमवारी सायंकाळी दुचाकीने शिंदी गावाकडे जात होते

सकाळ वृत्तसेवा

तालुक्यातील शिंदी येथील सियाम हे त्यांचा मुलगा अमन व मुलगी मुस्कान यांना घेऊन सोमवारी सायंकाळी दुचाकीने शिंदी गावाकडे जात होते

केज (केज): केज-मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गावरील उमरी पाटीजवळ दुचाकीला एका कारने जोराची धडक दिल्याने सोमवारी (ता.१६) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अपघात झाला. यात दुचाकीवरील बाप-लेकांचा मृत्यू झाला तर मुलगी जखमी झाली. सिय्याम सय्यद (वय ३५) आणि अमन सय्यद (वय १४) अशी मृतांची नावे आहेत.

तालुक्यातील शिंदी येथील सियाम हे त्यांचा मुलगा अमन व मुलगी मुस्कान यांना घेऊन सोमवारी सायंकाळी दुचाकीने शिंदी गावाकडे जात होते. त्यांची दुचाकी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव पाटील सहकारी साखर कारखान्याजवळील उमरी पाटीजवळ आली असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या कारची (एमएच-०५, सीए-३३८६) त्यांना धडक बसली.

या अपघातात दुचाकीवरील सिय्याम सय्यद यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची मुलगी मुस्कान (१२) व मुलगा अमन हे गंभीर जखमी झाले होते. रात्रीची वेळ असल्याने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यास काहीसा विलंब झाला. त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथे शासकीय रुग्णालयात घेऊन गेले असता मुलगा अमन सय्यद याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, राज्यपाल रात्री अचानक गेले राज्याबाहेर; काँग्रेससमोर पेच?

Rajat Patidar: आरसीबी फायनलमध्ये! पाटीदारच्या 'त्या' एका निर्णयामुळे गुजरात टायटन्स भुईसपाट; नेमकं काय घडलं?

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

Vaibhav Sooryavanshi: 'नवा सिक्सर किंग...', गेलची आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या वैभवसाठी स्पेशल पोस्ट; काय म्हणाला एकदा पाहाच

भेदक नजर आणि गूढ व्यक्तिमत्त्व ! घबाडकुंड सिनेमात शशांक शेंडे दिसणार मांत्रिकाच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT