file photo 
मराठवाडा

मोफत साडीचा फंडा...महिलेला ६१ हजाराचा गंडा 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : एका महिलेला रस्त्यात गाठून दोन भामट्यांनी गल्लीत मोफत साड्या वाटप सुरू आहेत. असे म्हणून तिला थोडे बाजूला घेऊन तिच्याजवळील तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व एक मोबाईल असा ६१ हजाराचा ऐवज घेऊन पोबारा केला. हा प्रकार अण्णाभाऊ साठे चौक परिसरात गुरूवारी (ता. सहा) सायंकाळी चारच्या सुमारास घडला. या प्रकरणी शनिवारी (ता. आठ) रात्री शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोन भामट्यांविरुद्ध शनिवारी (ता. आठ) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विष्णूनगर येथील सुभद्रा राजाराम सामलेटी (वय ७८) ही महिला आपल्या भावाला भेटून घराकडे जाण्यासाठी ती व्हीआयपी रस्त्यावर ॲटोची वाट पहात थांबली होती. यावेळी तिच्याजवळ एका दुचाकीवरून दोन तरूण आले. आजीबाई आत गल्लीत मोफत साड्या वाटप करत आहेत. तुम्लाही साडी घ्या. असा सल्ला देत तुमच्या गळ्यातील गंठण व मोबाईल एका कापडी पिशवीत बांधून ठेवा. असे सांगितले. मात्र तिला गाठ बांधता येत नसल्याने त्यांनी बांधून देतो अशी बतावणी करून दागिणा व मोबाईल लंपास केला. पुढे जावून पाहते तर साडी वाटप नव्हते. त्यांनी परत येऊन त्या तुरूणांना पाहिले. तोपर्यंत ते भामटे तेथून पसार झाले होते. आपली फसगत झाल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने शनिवारी (ता. आठ) रोजी रात्री शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठले. सुभद्रा राजाराम सामलेटी यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस नाईक श्री. चाटे करत आहेत. 

एक्स्ट्रा क्लासला गेलेली विद्यार्थीनी बेपत्ता 

नांदेड : वजिराबाद परिसरातील एका शाळेत शिक्षण घेणारी विद्यार्थीनी एक्स्ट्रा क्लासला म्हणून घरून आली. परंतु ती परत घरी आली नाही. तिच्या नातेवाईकांनी शोध घेतला मात्र ती सापडली नसल्याने वजिराबाद पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड शहराच्या चौफाळा परिसरातील एक विद्यार्थीनी दहावीच्या एक्स्ट्रा क्लासला जाते म्हणून घरातून शुक्रवारी (ता. सात) रोजी सकाळी वजिराबादला आली. परंतु ती क्लास झाल्यानंतर आपल्या घरी परत गेली नाही. तिच्या नातेवाईकांनी मैत्रीणीकडे शोध घेतला. परंतु ती सापडली नाही. अखेर तिच्या पालकानी वजिराबाद पोलिस ठाण्यात जावून मुलगी हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक शरद मरे करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Jejuri News: 'जेजुरीत जर भाविकांकडून भंडारा घेण्याची सक्ती केली तर...' पोलिसांनी दिला कडक इशारा

RCB Party: आरसीबीच्या विजयापेक्षा विराट-भुवीच्या 'त्या' जुन्या मैत्रीच्या व्हिडिओने जिंकली मनं!

SCROLL FOR NEXT