ABD20G94490 
मराठवाडा

गूड न्यूज ; सिध्देश्वर धरणाचे दहा दरवाजे उघडले

राजेश दारव्हेकर

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील सिध्देश्वर धरणाचे सोमवारी (ता.सात) सायंकाळी साडेपाच वाजता दहा दरवाजे उघडले असून सात हजार २८२ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदीच्या काठावर असलेल्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात येणाऱ्या सिध्देश्वर धरणात येलदरी धरणातून सोडलेल्या पाण्याची आवक सुरू आहे. आज या धरणाचे दोन दरवाजे उघडले आहेत. यामुळे सिध्देश्वर धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. 

येलदरी धरण शंभर टक्के भरल्याने दरवाजे उघडले
येलदरी धरण शंभर टक्के भरल्याने या धरणात पाण्याची आवक पाहता सिध्देश्वर धरणाचे सायंकाळी साडेपाच वाजता दहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातुन सात हजार २८२ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी पुर्णा नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने या नदीला पुर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नदी काठावरील गावांना पुर नियंत्रण कक्षातर्फे सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

या क्रमांकाचे दरवाजे उघडले 
दरम्यान सिध्देश्वर धरणाचे दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, अकरा आणि तेरा क्रमांकाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. यावर्षी सिध्देश्वर दोन ते तीन वेळेस पुर्णा नदीपात्रात धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे या भागातील विहीर व बोअरवेलची पाणीपातळी कमालीची वाढली आहे. या भागातील शेतकरी समाधानी झाले आहेत. यावर्षी उन्हाळ्यात देखील धरणात मुबलक पाणीसाठा राहणार असल्याने उन्हाळ्यात या भागातील पुर्णा नदीसह कालव्यातून पाणी सोडले जाणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 
पूर्ण भरलेल्या येलदरी धरणाचे आज दोन दरवाजे उघडून विसर्ग सुरू आहे. तो सिद्धेश्वर धरणात येत आहे. त्यामुळे हे धरणही शंभर टक्के भरले आहे. पाण्याची सुरू असलेली आवक पाहता सिद्धेश्वर धरणाचे दहा दरवाजे आज सायंकाळी साडेपाचला उघडण्यात आले. यातून सात हजार २८२ क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे पूर्णा नदीला पूर येण्याची शक्यता असल्याने पूर नियंत्रण कक्षाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

संपादन ः राजन मंगरुळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT