Beed sakal
मराठवाडा

Beed : जिल्हा आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य सेवा मिळवून देणार की यंत्रणेचा भाग होणार ?

अनेक उपकेंद्रे कुलूपबंदच : अधिकाऱ्यांचे दांडीसत्र अन् उंटावरून शेळ्या

दत्ता देशमुख : सकाळ वृत्तसेवा

अनेक उपकेंद्रे कुलूपबंदच : अधिकाऱ्यांचे दांडीसत्र अन् उंटावरून शेळ्या

आरोग्य यंत्रणा काेलमडली

बीड : ग्रामीण जनतेला आणि शेवटच्या टोकापर्यंत प्राथमिक आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचे जिल्हाभर जाळे असले तरी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दांडीसत्र आणि उंटावरुन शेळ्या असा प्रकार असल्याने ही यंत्रणा केवळ देखाव्यापुरतीच आहे. आता साथीच्या आजारांचा काळ असल्याने आता तरी किमान प्राथमिक आरोग्य सेवा मिळाव्यात, अशी जिल्ह्यातील ग्रामीण जनतेची अपेक्षा आहे.

ग्रामीण आरोग्य सेवेत (प्राथमिक आरोग्य केंद्र) जिल्ह्यात तब्बल ३५० वैद्यकीय अधिकारी असले तरी नियमबाह्यपणे अधिकारी ड्युट्या वाटून घेण्याचा प्रघातच पडला आहे. बाँडेड अधिकाऱ्यांना तर आरोग्य केंद्रांकडे येण्याचीच ॲलर्जी आहे. वरिष्ठांना खुश केले तरी त्यांचे भागते. बहुतांशी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयाचे वावडे असल्याने रात्रीच्या वेळी साधी तापही आली तरी शहर गाठावे लागते. काही उपकेंद्र तर कायमच कुलूपबंद आहे.

दिवस वाटून घेणे, दुपारनंतर आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रांकडे न फिरकणे, रात्रीच्या वेळी कोणीच नसणे, मुख्यालयी न राहणे या प्रकारामुळे ग्रामीण जनतेला आरोग्यसेवा मिळत नाही. त्यामुळे रात्रीच्यावेळी श्वानदंश, ताप वा अन्य काहीही आरोग्य विषयक अडचण असेल तर थेट भाड्याचेवाहन करुन शहर गाठावे लागते, असे बहुतांशी आरोग्य केंद्रांचे चित्र आहे. विशेष म्हणजे प्रसुती करणाऱ्या आरोग्य केंद्रांची संख्या दोन अंकी देखील नाही.

उपकेंद्रांतून लसीकरणासह इतर उपक्रम राबविण्याबरोबच नित्याने प्राथमिक आरोग्य सेवा मिळणे अपेक्षित असून अलिकडे समुदाय आरोग्य अधिकारी हे पद निर्माण झाले तरी यात कुठलीही सुधारणा झालेली नाही. तालुक्याच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी गावागावांतून किरकोळ आजारांचे रुग्ण आलेले असतात हे चित्र बदलण्याची गरज आहे.

प्रसुतीचीही ॲलर्जी

जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रसुती झालीच पाहिजे व त्यासाठीचे तज्ज्ञ मनुष्यबळही असते. मात्र, जिल्ह्यात प्रसुती होणाऱ्या आरोग्य केंद्रांची संख्या दोन अंकी देखील नाही. ग्रामीण जनतेला प्रसुतीसाठी शहरातील आरोग्य संस्थेपर्यंत हेलपाटा मारण्यासाठी वाहनभाडे, त्रासही सहन करावा लागतो. मात्र, याकडे अधिकाऱ्यांचा संपूर्ण कानाडोळा आहे.

सुधारणा करणार की यंत्रणेचा भाग होणार?

जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती मिळालेले डॉ. उल्हास गंडाळ हे जिल्ह्यातीलच आहेत. आता डॉ. गंडाळ ही प्रचलीत प्रघात मोडून कागदोपत्री चालणाऱ्या उपक्रमांपलिकडे सामान्यांना प्राथमिक आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार का? ते देखील याच यंत्रणेचा भाग होणार, हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

मुलांना शाळेत जायला चीनने बांधली ९०० फूट उंच लिफ्ट, आता पर्यटकांची होते गर्दी; विद्यार्थ्यांचा ३ तासांचा प्रवास काही मिनिटात

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Uttar Pradesh: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्के वाढ! दीड लाखांहून अधिक महिलांना योगी सरकारचे गिफ्ट

SCROLL FOR NEXT