bjp bjp
मराठवाडा

हिंगोली भाजपा जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव यांचा तडकाफडकी राजीनामा

जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे

पंजाब नवघरे

जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे

वसमत (हिंगोली): हिंगोली भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड. शिवाजी जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. प्रकृती व पक्षासाठी वेळ देता येत नसल्याने आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जाधव यांनी स्वतः टोकाई कारखाना सुरु केला होता. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने वसमत विधानसभा मतदार संघातून सहा जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले होते. तर वसमत पंचायत समितीवर स्पष्ट बहुमत मिळून पहिल्यांदाच भाजपचा सभापती झाला होता.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यानंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी पक्षाला चांगले दिवस आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले. आता जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. यासंदर्भात जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रकृतीच्या कारणामुळे आपण राजीनामा दिला असून यापुढेही भाजपमध्येच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anganwadi Sevika Promotion : अंगणवाडी सेविकांसाठी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! वयोमर्यादेचा अडथळा दूर, 55 वर्षांपर्यंतच्या सेविकांना मिळणार पदोन्नती, 'ती' अट रद्द

मालाड स्टेशनवर चुकीचा स्पर्श, पुन्हा तेच करायला आला... प्राप्ती रेडकरने सांगितला तो प्रसंग; म्हणते- मी थेट त्याची...

Maharashtra Live News : कोल्हापुरात शेतकऱ्यांचा चक्काजाम; साखरेचा एक कणही बाहेर पडू देणार नाही : राजू शेट्टी

पूरा इंडिया, अब दुबई आ रहा है! सूर्यकुमार यादवने Dubaiत खरेदी केलं घर, कारणही सांगितलं.. म्हणाला, इथे जी सुरक्षा मिळतेय...

Kagal to Hubli Highway Closed : कागल ते हुबळी महामार्ग बंद, कोल्हापूर आयजी रंजनकुमार शर्मा यांनी सांगितला पर्यायी मार्ग; शेतकरी संघटनांची भूमिका काय?

SCROLL FOR NEXT