file photo 
मराठवाडा

हिंगोली : वारंगा फाटा येथे एकाच रात्री पाच दुकानांत चोरी, सव्वा लाखाचा ऐवज लंपास

मुजाहेद सिद्दीकी

वारंगा फाटा (जिल्हा हिंगोली) : कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथे अज्ञात चोरट्यांनी पाच दुकानांचे शटर वाकवून ९३ हजार रोख व एक लँपटाँप पळवून नेल्याची घटना गुरुवारी (ता.दहा) भल्या पहाटे घडली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, वारंगाफाटा ही मोठी बाजारपेठ आहे. तसेच हिंगोली ते नांदेड व विदर्भाकडे जाणारा देखील मार्ग आहे. येथे छोट्या मोठ्या चोरीच्या घटना नेहमीच घडतात. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास येथील बाजारपेठेत अज्ञात चोरट्यांनी सलग पाच दुकानांचे शटर वाकवून चोरी करुन दोन दुकानातील रोख ९३ हजार व एक लँपटाँप लाबंविला आहे. यात वैष्णवी एजन्सी येथून ९३ हजार नगदी व एक लँपटाँप तर हायटेक अँग्रो एजन्सी येथील तीन हजार रुपये रोख लांबविले आहेत. 

तर हायटेक अग्रो सेंटर, गोविंद ट्रेडिंग कंपनी, अंचल किराणा व एका डेअरी सेंटरचे शटर वाकविले आहे. या ठिकाणी मात्र चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. 

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक  रवी हुंडेकर, वारंगा फाटा बीट हवालदार शेख बाबर यांच्यासह पोलीस दाखल झालेले आहेत. ठसे तज्ञांना देखील पाचारण करण्यात आले आहे. पुढील तपासकार्य सुरू आहे. याबाबत  पोलीस ठाण्यात कोणताही नोंद झाली नव्हती. एकाच रात्री राष्ट्रीय महामार्ग लगत एवढ्या मोठ्या प्रमाणात शटर वाकून धाडसी चोरी केल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. येथे रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Singer Nisar Vaynad : उदित नारायण यांची ‘कार्बन कॉपी’! प्रसिद्ध गायकाचे वयाच्या ४४व्या वर्षी निधन; दुबईत घेतला अखेरचा श्वास

Mohan Bhagwat: ब्रिटनमधील हिंदूंची ब्रिटन हीच कर्मभूमी: मोहन भागवत; कर्मभूमीशी प्रतारणा करण्यास हिंदुत्व सांगत नाही

Baba Amte Anandwan: बाबा आमटेंचे ‘आनंद निकेतन’ हस्तांतराच्या वाटेवर, पुनर्बांधणीचा खर्च पेलवेना, आनंदवनातील कॉलेज अडचणीत

Motivational Story: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या; रमाबाईंच्या जिद्दीची सरन्यायाधीशांनी घेतली दखल, संघर्षाची प्रेरणादायी कहाणी..

तुम्हाला मूल्यमापन करण्याची गरज आहे का?

SCROLL FOR NEXT