file photo 
मराठवाडा

हिंगोली : कयाधुचे पात्र आटले, जनावरांच्या पाण्याच्या प्रश्नासह सिंचनाचा प्रश्न गंभीर

राजेश दारव्हेकर

हिंगोली :  येथील कयाधु नदीचे पात्र मार्च महिन्यात कोरडेठाक पडल्याने जनावरांच्या पाण्याच्या प्रश्नासह सिंचनाचा प्रश्न बिकट बनला आहे. त्यामुळे जवळपास असलेल्या शेतातील विहिरी व विंधन विहिरीची पाणी पातळी खालावली आहे.

परभणी पासून हिंगोलीचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी आमदार तानाजी मुटकुळे यांनी मागील पाच वर्षापासून प्रयत्न चालविले आहेत. पावसाळ्यात कयाधु नदीला आलेला पूर  थेट बंधारे नसल्याने पाणी वाहून  जात आसल्याने ऐन उन्हाळ्यात नदी कोरडी  पडत असल्याचे चित्र आहे. कयाधु नदीवर २०१८-१९ मध्ये नदी पुनर्जीवन कार्यक्रमात सात सिमेंट नाला बांध उभारण्यात आले होते. यामध्ये कोंडवाडा काहाकर तीन, जयपूर तीन, अशी सात सिमेंट नाला बांधची कामे पूर्ण होऊन दोन वर्षांचा काळ लोटला आहे. यासाठी एक कोटी चाळीस लाख खर्च झाला आहे.

एकूण १४  बॅरेजेस उभारणीला मंजुरी मिळाली आहे. यातून सात कामे पूर्ण झाली आहेत. सात कोल्हापुरी बांधाऱ्या पैकी पाच कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये खरबी ,दुर्गधामनी,समगा टाकळगव्हाण, शेवाळा, वरुड, सेनगाव  या गावाचा समावेश आहे.

कयाधु नदीतील पाणी अडविण्यासाठी उर्वरित कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाल्यानंतरच पाणीसाठा ऐन उन्हाळयात जमा राहू शकतो,  बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर नदी काठावरील गावातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आल्यास बारा महिने पिके घेता येतील. हा परिसर वाळवंट होण्याऐवजी सुपीक होणार आहे. आता काही बंधाऱ्यात थोडा फार पाणीसाठा शिल्लक आहे. तर उर्वरित भागात बंधाऱ्यांची कामे झाली नसल्याने आजघडीला कयाधुचे पात्र कोरडेठाक पडल्याचे चित्र आहे. बंधाऱ्यांची कामे मार्गी लागल्यास सिंचनाशिवाय तेरा ते १४ गावांचा पिण्याचा पाणी प्रश्न मिटणार आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT