parbhani  sakal
मराठवाडा

Parbhani Crime : अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य, वसतिगृह चालकावर गुन्हा नोंद ; परभणीतील घटना

वसतिगृहात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलावर त्याच वसतिगृह चालकाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सदरील वसतिगृह चालकावर कोतवाली पोलिस ठाण्यात ता. २६ जानेवारी रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

परभणी : वसतिगृहात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलावर त्याच वसतिगृह चालकाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सदरील वसतिगृह चालकावर कोतवाली पोलिस ठाण्यात ता. २६ जानेवारी रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

परभणी शहरातील पेडगाव रोड परिसरात सुदर्शन भांबळे हा सह्याद्री निवासी गुरुकुल नावाचे वसतिगृह चालवितो. वसतिगृहातील आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यासोबत आरोपी सुदर्शन भांबळे याने डिसेंबर २०२३ मध्ये अनैसर्गिक कृत्य केले. पीडित मुलाने ही गोष्ट भीतीपोटी कोणाला सांगितली नाही.

काही दिवसांपूर्वी शाळेला सुट्टी असल्याने पीडित मुलगा गावी गेला होता. सुट्ट्या संपल्यावर तो परभणीला येण्यासाठी घाबरत होता. पीडित मुलाच्या आईने मुलाला विचारले असता त्याने पूर्ण प्रसंग आईला सांगितला. पीडित विद्यार्थ्याचे वडील आणि काका या दोघांनी सह्याद्री वसतिगृहात येवून जाब विचारला असता सुदर्शन भांबळे याने या दोघांनाही मारहाण केल्याचे मुलांच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले.

या प्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी वसतिगृह चालक सुदर्शन भांबळे याच्याविरुद्ध ता. २६ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला. सदरील गुन्ह्याचा तपास कोतवाली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश मुळे करत आहेत. या प्रकरणातील आरोपी सुदर्शन भांबळे हा सध्या फरार असल्याची माहिती मुळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT