new accident jalna 
मराठवाडा

दुर्दैवी! दोस्ती संपली, परीक्षेला जाताना दोघांचा मृत्यु

बाबासाहेब गोंटे

अंबड (जालना): अंबड-जालना महामार्गावरील शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रिलायन्स व महालक्ष्मी पेट्रोल पंपाच्या जवळ सोमवारी (ता.एक) दुपारी साडे बारा वाजता एक भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीला पाठीमागून जोराची धडक बसल्याने दोन्ही दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी होऊन ठार झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील अभिषेक दादासाहेब टकले (वय 20) व अमर सतीश टकले( 21)  हे दोघे एका दुचाकीवरून अंबड शहरात परक्षा देण्यासाठी जात होते. त्यांच्या पाठीमागे असलेल्या दुचाकीने पुढे काढताना हुलकावणी दिल्याने अमर व अभिषेक दुचाकीवरून खाली पडून गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. इतर दोघे दोन दुचाकी वरून पुढे निघून गेले. त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी परत येऊन गंभीर जखमी झालेल्या अभिषेक टकले व अमर टकले या दोघांना उपचारासाठी अंबडला घेऊन गेले.

मात्र त्यांना दोन्ही ठिकाणी दाखल करून न घेतल्याने औरंगाबादला हलविण्यात आले. पण दोघे अपघात स्थळावरच गतप्राण झाल्याने त्यांच्यावर उपचार करण्याची संधी मिळाली नाही. औरंगाबाद येथे शवविच्छेदन करण्यात आले. सोमवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची वार्ता समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अंबड शहर व परिसरात सध्या सिमेंट रस्त्याचे काम मंदगतीने सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. याचबरोबर अनेक ठिकाणी पुलाचे काम रखडले आहे. महामार्गावर दुभाजक नसल्याने सारखे अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG : टीम इंडिया अफगाणिस्तानला घाबरलीय! माजी खेळाडूची निवड समितीवर टीका; म्हणाले, हताश होऊन उचललेले पाऊल...

Subhash Chandra: सुभाष चंद्रा यांच्यावर सीबीआयकडून फसवणुकीचा गुन्हा; 'एलआयसी'च्या तक्रारीवरुन मोठी कारवाई

Pakistan Chief of Defence Forces : पाकिस्तानची नवी खेळी; लष्करी व्यवस्थेत ऐतिहासिक सत्ताबदल, असीम मुनीर बनले ‘चीफ ऑफ डिफेन्स'

Marathi News Live Updates: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रितेश हांगे नावाच्या तरुणाला अटक

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना बाप्पा पावणार! गणेशोत्सवात महिलांना मिळणार ३,०००? योजनेबाबत नवी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT