Essential-Goods Sakal
मराठवाडा

jalna : होलसेल किराणा बाजारात उत्साह

गुजरात, छत्तीसगडमधून शेंगदाणा, भाजके पोहे दाखल

सकाळ वृत्तसेवा

जालना : नवीन व जुन्या मोंढ्यात दिवाळी सणासाठी किराणा मालाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गुरुवारी ( ता.१३) चतुर्थीपासून मालाला अधिक उठाव मिळेल, असे मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी सांगितले. गुजरात राज्यातून शेंगदाणा तर छत्तीसगड राज्यातून भाजके पोहे आवक होत आहे.

दहा दिवसावर दिवाळी सण आला आहे.शहरातील नवीन आणि जुना मोंढ्यात किराणा बाजारात उलाढाल वाढली आहे.होलसेल किराणामाल खरेदी करण्यासाठी जिल्ह्यासह देऊळगावराजा, सिंदखेडराजा तसेच विदर्भातील व्यापारी मोठ्या प्रमाणावर खरेदीला दिसून येत आहे. नवीन मोंढ्यात ठोक किराणामालात साखर, रवा, मैदा, तेल, भाजके पोहे, मुरमुरे, सुकामेवा खरेदीला अधिक पसंती दिसून येत आहे.

जालन्यातील मोंढ्यात यंदा गुजरात येथून शेंगदाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे.छत्तीसगड राज्यातून भाजके पोहे आवक होत आहे. मका पोहे आपल्याकडे उत्पादन होत असल्याने मालाला उठाव असला तरी भाव मात्र स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

आजपासून ग्राहकी

शहरातील नवीन मोंढ्यात गुरुवारी चतुर्थीपासून ठोक ग्राहकीला सुरुवात होईल,असे एका व्यापाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील ग्रामीण भागासह विदर्भातील अनेक ठिकाणचे किराणा दुकानदार ठोक किराणामाल माल खरेदीसाठी येतात.

दिवाळी सणासाठी किराणामालात ठोक वस्तू खरेदीसाठी अनेक दुकानदार येतात. यंदा दिवाळी सण असला तरी किराणामालात भाववाढ अशी झालेली नाही. ग्रामीण भागातील ग्राहकी सध्या मोंढ्याकडे वळली नसल्याचे दिसून येते. पुढील काही दिवसांत खरेदीला तेजी येईल.

- सतीश पंच,

जिल्हाध्यक्ष, होलसेल किराणा व्यापारी महासंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS transfers: महाराष्ट्रात मोठा प्रशासकीय फेरबदल! १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; माजी DGP रश्मी शुक्लांवर नवी जबाबदारी

IND vs AFG, 2nd ODI : शुभमन गिल - ईशान किशनची वादळी शतके! भारतीय संघ चारशे धावा पार अन् विश्वविक्रमाची बरोबरी

RBI Recruitment: विनापरीक्षा लाखो रुपयांची नोकरी, फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी; आरबीआयच्या भरतीसाठी अर्ज कसा करणार?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भेट घेतली

पैसे मिळाले तर पुन्हा बैलासमोर नाचशील का? क्षणाचाही विचार न करता गौतमी पाटीलने दिलं उत्तर, म्हणते- भाई...

SCROLL FOR NEXT