Jalna OBC Sabha 
मराठवाडा

Jalna OBC Sabha: "स्वकष्टाचे खातो, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडा मोडत नाही"; छगन भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल

Sandip Kapde

Jalna OBC Sabha: ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा विरोध आहे. यासाठी ओबीसी समाज एकवटला असून जालना जिल्ह्यातील अंबड येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करत मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला. जरांगे विचारतात कुणाचं खाताय? अरे तुझं खातोय का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

"हा छगन भुजबळ स्वकष्टाचं खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडा मोडत नाही", असे छगन भुजबळ म्हणाले.

भुजबळ म्हणाले, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र ओबीसीतून आरक्षण देऊ नये. 56 मराठा मोर्चे निघाले पण आम्ही कुणाला विरोध केला. मात्र आम्ही कुणाचं घरं, दारं जाळली नाहीत. (Latest Marathi News)

ओबीसी आरक्षण घटनेनुसार आहे. ओबीसी आरक्षण म्हणजे गरीबी हटाव नाही. ओबीसीत सर्व जाती कायद्याने आल्या. तेव्हा आम्ही विरोध केला नाही. मात्र मराठा समाज अवैधरीत्या ओबीसी समाजात घुसतो आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ म्हणाले,  "EWS तून मराठा समाजाला जो लाभ मिळतो. तो लाभ ओबीसींना देखील मिळत नाही. मराठा समाजाला १०-११ कोटी मिळतात मात्र ओबीसी समाजाला हजार कोटी देखील मिळत नाहीत. EWS चा ८५ टक्के मराठा समाज लाभ घेतोय."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, विक्रोळीजवळ तांत्रिक बिघाड; लोकल ३० ते ४० मिनिटं उशिरा, स्थानकांमध्ये गर्दी

Stock Market Today: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात! IT शेअर्सचा जोरदार कमबॅक; पाहा कोणते शेअर्स वाढले?

T20 WC, IND vs ZIM: टिम इंडियात ट्विस्ट... संघाचा विश्वासार्ह फिनिशर परतला; आता समीकरणच बदलणार?

आमच्यामध्ये वाद आहेत... भावासोबतच्या नात्यामधील तणावावर पहिल्यांदाच बोलला अजिंक्य देव; म्हणाला- एक भाऊ म्हणून ...

केंद्राकडून निधी मिळेना, मंत्र्यांचं रडगाणं; पाठपुरावा करा म्हणत राहुल नार्वेकरांनी विधानसभेत दोन नेत्यांना फटकारलं

SCROLL FOR NEXT