parbhani sakal
मराठवाडा

Parbhani News : देेशासाठी महाराष्ट्राचे अतुल्य योगदान ; संभाजी भिडे यांचे प्रतिपादन

महाराष्ट्र ही साधू संत व शूरवीरांची भूमी आहे -संभाजी भिडे

सकाळ वृत्तसेवा

परभणी : हिंदुस्थानच्या रक्षणात महाराष्ट्रात अतुल्य योगदान मोठ आहे. ही जाणीव कायम आपल्या अंतःकरणात असली पाहीजे असे प्रतिपादन संभाजी भिडे यांनी बुधवारी (ता.२७) केले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची बुधवारी (ता.२७) परभणीत सभा झाली. महाराष्ट्र ही साधू संत व शूरवीरांची भूमी आहे. हिंदुस्थानच्या इतिहासात आजवर अनेक आक्रमणे झाली.

त्या प्रत्येक लढाईत महाराष्ट्र संपूर्ण ताकदीनिशी उभा राहीला. १६ व्या शतकात पाच पातशाहीला पराभव करून हिंदवी स्वराज्य स्थापन करनारे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा दिव्य आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक तरूणांनी देव, देश, धर्म कार्यात सहभागी झाले पाहिजे. तरच या जगाच्या पाठीवर आपण टिकून राहू.

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या रक्तगटाची तरूण पिढी निर्माण करण्यासाठी शिवप्रतिष्ठानच्या वतीने आगामी जानेवारी महिन्यात ता. २४ ते २८ जानेवारी धारतीर्थ गडकोट मोहीमचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिकाधिक तरूणांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. सभेच्या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून प्रेरणामंत्राने सुरूवात झाली. श्री तुळजा भवानी मातेच्या आरतीने समारोप करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT