Murder esakal
मराठवाडा

Hingoli Triple Murder : तो अपघात नव्हताच! मुलानेच केली आई-वडील अन् भावाची हत्या; कारण...

हिंगोली जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैसे देत नाहीत म्हणून एका तरुणाने आपले आई-वडील आणि भावाची हत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे

रोहित कणसे

मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैसे देत नाहीत म्हणून एका तरुणाने आपले आई-वडील आणि भावाची हत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस येथी ही घटना घडली आहे. एबीपी माझाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

११ जानेवारी सकाळी काही हिंगोलीतील डिग्रस वाणी शिवारात एका रस्ते अपघातात आई-वडिल आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. प्राथमिक दृष्ट्या हा अपघात असल्याचे सर्वांना वाटले. मात्र जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांना या अपघाताबद्दल संशय आला. हा अपघाताचा बनाव असल्याचा शंका आल्याने पोलीसांनी या प्रकरणात घराची तपासणी देखील केली, तेव्हा घरात सर्वकाही व्यवस्थित आढळून आलं. मात्र पोलीसांचा संशय तपासादरम्यान वाढत गेला.

यानंतर या प्रकरणी हिंगोली पोलीसांनी मृत दाम्पत्याचा मुलगा महेश जाधव याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. या चौकशीतून याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणाती आरोपीने क्राइम सीरियल पाहून आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याचे उघड झाले. आरोपीने जन्मदाती आई कलावती जाधव, वडील कुंडलीक जाधव आणि भाऊ आकाश जाधव या तीघांची हत्या केली. यासाठी तो अनेक दिवसांपासून तयारी करत होता.

आई-वडील खर्चासाठी पैसे देत नव्हते, तसेच पैसे मागितल्याने रागवत होते आणि नातेवाईकांमध्ये अपमान करत होते, याचा राग मनात धरून आरोपीने या हत्या केल्याचे समोर आले आहे. अखेर या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT