Maratha Reservation Protest 
मराठवाडा

"सुधारित GR अन् पाण्याचा ग्लास सोबत घेऊन या", जरांगे पाटील उपोषणावर ठाम!

Sandip Kapde

Maratha Reservation Protest: मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने जीआर काढला आहे. हा जीआर घेऊन अर्जुन खोतकर मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले आहेत.  मनोज जरांगे यांनी सरसकट आरक्षणाची मागणी केली होती. दरम्यान  मराठा आंदोलक मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत.  आज उपोषणाचा १० वा दिवस होता. जीआर मध्ये सुधारणा होणार नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरु राहणार, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

जीआरमध्ये सुधारणा करायच्या असतील मुंबई येथे शिष्टमंडळ जाईल. सुधारणा करत नाही तोवर आम्ही उपोषण मागे घेणार नाही. महाराष्ट्रातील मराठा समाजाला न्याय द्या, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली.

मला चालता येत नाही त्यामुळे मी मुंबईला जाणार नाही. माझे शिष्टमंडळ मुंबईला जाणार आहे. जीआरमध्ये सुधारणा झाल्यावर अर्जुन खोतकर यांनी पाण्याचा ग्लास घेऊन यावे, असे जरांगे पाटील म्हणाले.

मराठा समाजाकडे वंशावळीचे पुरावे असते तर तहसील किंवा उपविभागीय कार्यालयातून कुणबी मराठा जात प्रमाणपत्र मिळाले असते. त्यासाठी राज्य शासनाला अध्यादेश काढण्याची गरज पडली नसती.

राज्य शासनाकडून राज्यातील मराठा समाजला सरसगट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची आमची प्रमुख मागणी आहे. त्यामुळे काल राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करत आहोत. मात्र, आमच्या वंशावळी नसल्याचे दस्त नसल्याने या निर्णयाचा एक टक्का ही फायदा होणार नाही. (latest marathi news)

त्यामुळे राज्य शासनाने एक पाऊल पुढे येऊन या निर्णायातून वंशावळी शब्द काढून सरसगट असा शब्द प्रयोग करून राज्य शासनाने अध्यादेश काढावा. ही सुधारणा होईपर्यंत, आमचे आंदोलन शांततेत सुरू राहणार, असे जरांगे पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Pune Crime : पिंपरी चिंचवड हादरले ! निगडीतील मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; मेट्रो कामगाराला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT