Manoj Jarange  sakal
मराठवाडा

Manoj Jarange : राजकारण हा माझा धर्म नाही.. पुन्हा उपोषणावर मनोज जरांगे ठाम

सगेसोयऱ्यांबाबत निर्णयाची अंमलबजावणी, नोंदी सापडल्या आहेत अशांना लवकरच कुणबी प्रमाणपत्र मिळावे, आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्यांसाठी मनोज जरांगे-पाटील चार जूनपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

वडीगोद्री : सगेसोयऱ्यांबाबत निर्णयाची अंमलबजावणी, नोंदी सापडल्या आहेत अशांना लवकरच कुणबी प्रमाणपत्र मिळावे, आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्यांसाठी मनोज जरांगे-पाटील चार जूनपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.

या आंदोलनाला पाठिंब्यासाठी मोठ्या प्रमाणावर मराठा समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर मंडप, भोजन, पाणी, पार्किंग आदी व्यवस्थांच्या नियोजनासाठी जरांगे यांनी सोमवारी (ता.२७) अंतरवाली सराटी येथे गोदाकाठच्या १२३ गावांतील समाजबांधवांची बैठक घेतली. या बैठकीत जरांगे यांनी सांगितले की, ‘राजकारण हा माझा धर्म नाही. आरक्षण लढा सुरूच ठेवणार आहे.

समाजबांधवांनी खंबीरपणे पाठीशी उभे राहावे. सरकारला पाच महिन्यांचा वेळ दिला. अंतरवाली सराटी येथे सात-आठ महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली. तरीही सगेसोयऱ्यांबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. आम्ही मागीतले एक, तर शासनाने दुसरेच दिले. त्यामुळे अंतरवाली सराटी येथे चार जूनपासून उपोषणाला बसणार आहे.’

मराठा समाजाच्या दुकानात जाऊ नका, कीर्तनाला मराठा समाजाचे महाराज बोलावू नका, अशा स्वरूपाचे बीड जिल्ह्यातील एका गावात आवाहन करणाऱ्‍याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याबाबत जरांगे म्हणाले, मराठा समाज अशी भूमिका कधीच घेणार नाही. बीड जिल्हा संतांची भूमी आहे. तेथील दोन्ही समाजाने शांतता बाळगावी.’

समाज ओबीसींच्या विरोधात नाही

माझ्यासह समाज लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन, उपोषण करत आहे. मराठा समाज ओबीसींच्या विरोधात नाही. आपल्या न्याय्य व हक्कांसाठी समाज लढत आहे. समाज नेत्यांवर बोलत असेल तर ते पदावर आहे म्हणून बोलत आहे. वैयक्तिक कोणाला विरोध करत नाही, असे जरांगे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'

राहू येथे सलग दुसऱ्या दिवशी दुसरा बिबट्या जेरबंद; साडेचार वर्षांची मादी पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांमधे दहशत

Condom Company Stock: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरचा धमाका; सहा महिन्यांत २५७% वाढ, गुंतवणूकदार मालामाल

भातपीकाचे आगार धोक्यात; राजगड तालुक्यातील बहुतांशी भात खाचरे कोरडी, शेतकरी चिंतेत

Latest Marathi News Live Update : पंजाबमध्ये माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT