Manoj Jarange Patil Maratha Reservation Andolan 
मराठवाडा

20 तारखेला आंतरवली सराटीत जमा व्हा, एकही मराठा घरात राहू नका; मुंबईला जाण्याचा जरांगे पाटलांचा निर्धार

Manoj Jarange Patil Maratha Reservation Andolan: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारने मराठ्यांविरोधात ट्रॅप रचला आहे. सरकार आमच्याविरोधात खोटा बातम्या पसरवत आहेत, असं ते म्हणाले.

कार्तिक पुजारी

जालना- मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारने मराठ्यांविरोधात ट्रॅप रचला आहे. सरकार आमच्याविरोधात खोटा बातम्या पसरवत आहेत. यात कोणते मंत्री, नेते, पालकमंत्री आहेत हे मला माहिती आहे. कोण विरोध करतंय हेही मला माहिती आहे, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.

मनोज जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम आहेत. २१ जानेवारी रोजी सर्व मराठ्यांनी आंतरवाली सराटीमध्ये जमा व्हावे, आपल्याला मुंबईकडे रवाना व्हायचं आहे. यादिवशी कोणकोणते नेते येतात हे पाहायचं आहे. कोण नाही आलं तर ते मी पाहतोच. सरकार संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असं जरांगे पाटील म्हणाले. (manoj jarange patil maratha reservation andolan jalna )

५४ लाख नोंदी सापडल्या, पण तरी आरक्षण का देत नाही? मराठवाड्यात इतक्या कमी नोंदी कशा सापडल्या? आतापर्यंत मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यंत्र्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवलाय. पण, अजूनही लोकांना प्रमाणपत्र मिळत का नाहीत? इतक्या कोट्यवधींच्या संख्येने लोक रस्त्यावर येत आहेत. त्यांच्या न्यायासाठी मी रस्त्यावर उतरलो आहे. तुमच्याची मैत्री करण्यासाठी मी इथे आलो नाही, असं ते म्हणाले.

मी मुंबईला येणारच आहे. मला गोळ्या घातल्या तरी चालतील. पण, माझा विचार मरु देऊ नका. मराठ्यांची एकजूट तुटू देऊ नका. न्याय मिळेपर्यंत हटायचं नाही. आरक्षण मिळेपर्यंत परत येणार नाही. त्यांचा ट्रॅप मला माहितीये. कोणत्या मंत्र्यांनी ट्रॅप रचलाय. कोण मराठ्यांच्या विरोधात बोललाय मला माहितीये. जो येणार नाही त्याला मराठे लक्षात ठेवतील. मराठ्यांची फसवणूक सुरु आहे. पण, मी फसवणूक होऊ देणार नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.

मी सरकारच्या बाजूने नाही. ट्रॅप सरकारचा काय आहे हे मी २० तारखेनंतर सांगेन. काही पालकमंत्र्यांना सरकारने हाताशी धरलंय. ते रॅलीमध्ये येतील आणि फोटो काढून निघून जातील. मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचं काम त्यांना देण्यात आलं आहे. पण, कुणाचं ऐकू नका. मीडियातल्या बातम्या ऐकू नका, सरकार अफवा पसरवतंय, असं जरांगे पाटील म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Kharadi Accident : पुण्यात भीषण अपघात ! विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारची दुचाकीला धडक, तरुणासह चिमुकला ठार; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

Whatsapp Update : व्हॉट्सॲपमध्ये येतय नवीन ‘स्कॅम अलर्ट’ फीचर; फसव्या मेसेजचा लगेच मिळणार अलर्ट, पाहा कसं वापरायचं?

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये गेवराईत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Lalit Modi : दाऊद इब्राहिम, धमक्या अन् क्रिकेटमधून एक्झिट? ललित मोदींच्या खुलाशामागचं सत्य काय? पॅन्टमध्येच केली होती लघवी

Gold Rate Today: सोनं पुन्हा स्वस्त! सलग सहाव्या दिवशी भाव घसरले; महाराष्ट्रातील आजचा सोनं-चांदीचा दर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT