Maratha Reservation Esakal
मराठवाडा

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा आजपासून सुरू; असं असेल नियोजन

मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याचा चौथा टप्पा आजपासून सुरु होत आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याचा चौथा टप्पा आजपासून सुरु होत आहे. त्यांची जालना येथे सभा पार पडणार आहे. 1 ते 12 डिसेंबर असा त्यांचा दौरा असणार आहे. त्याआधी जालन्यामध्ये मनोज जरांगे यांची एक जाहीर सभा पार पडणार आहे. दुपारी एक वाजता या सभेचे आयोजन करण्यात आलं आहे.. नवीन मोंढा परिसरात सभा आयोजित करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

जालना शहरात मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी फुलांनी भरलेल्या 140 जेसीबी तयार ठेवण्यात आल्या आहेत. या जाहीर सभेत मनोज जरांगे आज काय बोलणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

मनोज जरांगे यांच्या दौऱ्याच्या चौथ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होणार आहे. विदर्भ आणि खान्देशमधील काही गावांना मनोज जरांगे भेट देणार आहेत. या दौऱ्याची सुरूवात जालन्यातून होणार आहे. तर पाचव्या टप्प्यात मनोज जरांगे हे कोकण दौरा करणार आहेत. (Marathi Tajya Batmya)

त्याचबरोबर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मनोज जरांगे नांदेड दौऱ्यावर असणार आहेत. त्यांच्या नांदेड जिल्ह्यामध्ये तीन सभा होणार आहेत. जरांगे यांची सर्वात मोठी सभा ही वाडी पाटी येथे पार पडणार आहे. वाडी पाटी येथे तब्बल 111 एकरात मनोज जरांगे यांची जाहीर सभा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT