maratha reservation protest 
मराठवाडा

Maratha Reservation : मुख्यमंत्री म्हणतात कुणबी असल्याचे पुरावे द्या, जरांगे म्हणतात सरसकट द्या! उद्या उपोषण सुटणार की नाही?

कार्तिक पुजारी

जालना- ज्यांच्याकडे वंशावळी असेल त्यांना गुरुवारपासून कुणबी प्रमाणापत्र देण्यात येईल. यासाठी जीआर काढण्यात येईल, असं सरकारनं सांगितलं आहे. मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देत असल्याचं जीआर आम्ही आधी पाहू. त्यानंतर उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

निजामकाळात मराठ्यांना असणारं आरक्षण आता देखील देण्यात येईल. तसेच सर्व मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. एक महिन्यात ती अहवाल देईल. आपण पारदर्शकता ठेवावी लागेल, अन्यथा लोक मला शेण खाऊ घालतील., असं जरांगे पाटील म्हणाले.

निजामकालीम नोंदी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत, राज्य सरकार याबाबत जीआर काढणार असल्याची माहिती शिंदे गटाचे नेते अर्जून खोतकर यांनी जरांगे पाटील यांना दिली.

निवृत्त न्यायाधीश यांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्यात आली आहे. समिती एक आठवड्यामध्ये निर्णय देईल अशी माहिती खोतकर यांनी दिली. मराठा आंदोलकांवरील सर्व खटले मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

मनोज जरांगे पाटील गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत निर्णय घेतील असं सांगण्यात आलंय. मनोज जरांगे पाटील यांची तब्येतीची आम्हाला काळजी आहे. लेखी स्वरुपातील आश्वासन आम्ही त्यांना उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत देऊ, त्यांनी याबाबत आपल्या सहकार्यांशी चर्चा करावी आणि आंदोलन मागे घ्यावं, असं आवाहन राजेश टोपे यांनी केली.

सरकारचा निरोप घेऊन अर्जून खोतकर आणि राजेश टोपे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी खोतकर यांनी जरांगे पाटलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोनवरुन संपर्क करुन दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT