MLA Meghna Sacore-Bordikar calls for action against police for beating trader in Jintur 
मराठवाडा

आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण : व्यापाऱ्यास मारहाण करणाऱ्या पोलिसावर कारवाई करा

राजाभाऊ नगरकर

जिंतूर (परभणी) : शहरातील एका व्यापाऱ्यास पोलिसांनी कुटुंबासमोर मारहाण केल्यामुळेच सदरील व्यापाऱ्याने आत्महत्या केली असल्याचा आक्षेप नोंदवून आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी शुक्रवारी (ता.२) पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. 

सटवाईमाता मंदिर परिसरातील रहिवासी नारायण डोईफोडे (वय ३८) हे खेडोपाडी फिरूनव बाजारहाट करून किरकोळ कापड विक्रीचा व्यवसाय करत. त्यासाठी त्यांनी दहा लाखाचे कर्ज काढले. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील सततच्या लॉकडाऊनमुळे मागील वर्षभरापासून कापड विक्रीचा व्यवसाय बंद पडल्याने आर्थिक संकटात सापलेल्या डोईफोडे यांच्या समोर कुटुंबाच्या पालनपोषणासह कर्जफेडीचा प्रश्न ऊभा ठाकला.

अशा बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलासह घर परिसरात हातगाड्यावर भाजीपाला विक्रीच्या व्यवसायाला बुधवारी (३१ मार्च) ला सुरुवात केली. याच दरम्यान संचारबंदीचे कारण देत पोलिसांनी मुलासमोर तसेच कुटुंबियासमोर डोईफोडे यांना जबर मारहाण करून विक्रीचे साहित्य हिसकावून घेतले. पोलिसांच्या या क्रतीमुळे त्यांना मोठा धक्का बसून झालेला अपमान सहन झाला नसल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला.

ही बाब अतिशय गंभीर असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून व्यापाऱ्याच्या आत्महत्येस जबाबदार ठरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार मेघना बोर्डीकर यांनी पोलिस अधीक्षक यांना केली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

free Seed Scheme: मोफत बियाण्यासाठी ३०-३५ किमी हेलपाटे; कृषी विभागाच्या भोंगळ नियोजनाने शेतकरी संतप्त, निलंग्यात कृषी विभागाविरोधात नाराजी

Latur Farmer: अधिकारी फोटो काढून गेले अन्... मदतीचा बैलही निघाला आजारी; लातूरच्या शेतकऱ्याच्या दु:खाला अंतच नाही!

Akola News: मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईचाही बुडून मृत्यू; धार्मिक स्नान ठरले अखेरचे, समशेरपूर येथील घटना!

OnePlus Turbo 6X Pro मोबाईलची धमाकेदार एन्ट्री! चक्क 8000mAh एवढी मोठी बॅटरी; लॉन्च होताच डिस्काउंट, किंमत फक्त...

Latest Marathi News Live Update : गर्भवती असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी

SCROLL FOR NEXT