teachers protest Sakal
मराठवाडा

Parbhani News : शिक्षिकेने शिक्षणाधिकारी कार्यालयातच बांधला मुलाचा झोका; वेतनासाठी शिक्षकांचे आंदोलन

वेतनासाठी सोनपेठच्या मुक्तेश्वर विद्यालयातील शिक्षकांचे आंदोलन

गणेश पांडे

परभणी : गेल्या 10 वर्षापासून वेतन मिळत नसल्याच्या कारणावरून सोनपेठ शहरातील मुक्तेश्वर विद्यालयातील शिक्षकांनी कुटूंबासह बुधवारी (ता.22) जिल्हा परिषदेच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. आंदोलनादरम्यान बाळ रडत असल्यामुळे आंदोलनातील एका शिक्षिकेने शिक्षणाधिकारी कार्यालयातच झोका बाधून बाळाला झोपवले.

सोनपेठ (जि.परभणी) येथील मुक्तेश्वर विद्यालयातील शिक्षक के.टी.तोडकरी, ए.के.लोणे, जे.व्ही.कुलकर्णी, के.पी.जोगदंड, आर.आर.चौरे व पी.आर. बुच्छलवार या सहा शिक्षकांचा गेल्या 10 वर्षापासून पगार बंद आहे. संस्थाचालक बबन कुरे आणि संबंधित मुख्याध्यापक या शिक्षकांवर दबाव आणत असल्याचा आरोप या शिक्षकांनी केला आहे.

पगार नसल्याने कुटंबाची उपासमार होत असल्याचेही य़ा शिक्षकांचे म्हणणे आहे. या संदर्भात या शिक्षकांनी न्यायालयातही धाव घेतली आहे. न्यायालयाने शिक्षकांचे नियमानुसार वेतन द्यावे असा निर्णय दिलेला असतांनाही जिल्हा परिषद शिक्षक विभाग व संबंधीत संस्थाचालक या निर्णयाला मानत नसल्याने या शिक्षकांना वेतनापासून वंचित रहावे लागत असल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे.

बुधवारी (ता.22) या सहा शिक्षकांनी त्यांच्या कुटूंबासह जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात धडक मारली. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलनात सहभागी असलेल्या एका शिक्षिकेचे लहान मुल जोरजोरात रडत होते. त्यामुळे या शिक्षिकेने शिक्षणाधिकारी यांच्या दालनातील छताला कपड्याची झोळी करून मुलाला त्यात झोपवून शांत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा मुसळधार! 'या'१२ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी, हवामानाचा विभागाचा अंदाज

Suraj Sakhare Firing in Kolhapur : डोळ्यांदेखत गोळीबार पाहून बोबडीच वळली; टायर फुटल्यासारखा मोठा आवाज अन्..; प्रत्यक्षदर्शी कामगाराने सांगितला घटनेचा थरार

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! मगरपट्ट्याचा उड्डाण पूल पाडणार; भैरोबानाला-हडपसर ते यवत ३६.५ किमी उड्डाण पूल हाेणार, मेट्रो विस्तारालाही गती

Maharashtra Land: राज्य सरकारचा मोठा निर्णय! वर्ग-२ जमिनी थेट वर्ग-१ मध्ये; लाखो भूखंडधारकांना मालकी हक्काचा मार्ग मोकळा

Matar Khasta Kachori: मैद्याची कुरकुरीत कचौरी अन् चिंच-गुळाची चटणी; जाणून घ्या बाराबंकीच्या प्रसिद्ध 'मटर खस्ता'ची सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT