हिंगोली हिंगोली
मराठवाडा

हिंगोलीत भाजपा, शिवसेना कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत जनआशीर्वाद यात्रेदरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत प्रचंड रोष निर्माण झाला आहे

सकाळ वृत्तसेवा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत जनआशीर्वाद यात्रेदरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत प्रचंड रोष निर्माण झाला आहे

हिंगोली: हिंगोलीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मंगळवारी (ता.२४) भाजप व शिवसेनेत चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातही वाद उफाळू नयेत यासाठी भाजपा व शिवसेना या दोन्ही कार्यालयासमोर तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर औंढा नागनाथ येथे राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत जनआशीर्वाद यात्रेदरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत प्रचंड रोष निर्माण झाला आहे. काही ठिकाणी तर भाजप व शिवसेना कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. त्याचे पडसाद हिंगोली जिल्ह्यात उमटू नयेत यासाठी खबरदारी म्हणून पोलिस प्रशासनाने जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाईक नगर येथील भाजप व बसस्थानकजवळ असलेल्या शिवसेना कार्यालयासमोर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

औंढा येथे नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन-

औंढा येथे नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन-

शहरात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने मंगळवारी (ता. २४) राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तालुका प्रमुख साहेबराव देशमुख यांच्या नेतृत्त्वामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी नारायण राणे यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजीही करण्यात आली.यावेळी उपजिल्हाप्रमुख जि. डी. मुळे, माजी उपसभापती अनिल देशमुख शहराध्यक्ष अनिल देव, युवा सेना शहराध्यक्ष माधव गोरे सतीश चौढेकर, राम मुळे, शंकर यादव, प्रदीप कनकुटे, सचिन राठोड, राजू वाकुडे, कपील खदारेसह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

औंढा शहरांमधून नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे रॅली काढून औंढा नागनाथ शहरातील जुने बसस्थानक परिसरामध्ये पुतळ्याचे दहन करण्यात आले. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुवर्णा वाळके दाखल झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT