NEET 
मराठवाडा

NEET-UGC: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन; लातूरमधून 2 शिक्षक ताब्यात

NEET-UG Latest Update: मिळालेल्या माहितीनुसार, संजय जाधव आणि जलिल पठाण असं शिक्षकांचं नाव आहे. दोघेही जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहेत.

कार्तिक पुजारी

NEET-UG 2024: नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणामध्ये महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे. नीट-यूजी गैरप्रकारात हात असल्याच्या संशयातून लातूरमधील दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले आहे. नांदेड एटीएसने यासंदर्भात कारवाई केली आहे. एटीएसने दोन ठिकाणी छापे टाकत ही कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय जाधव आणि जलिल पठाण असं शिक्षकांचं नाव आहे. दोघेही जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहेत. एटीएसने दोन ठिकाणी छापे टाकत ही कारवाई केली आहे. लिंक शोधण्यासाठी एटीएसने संशयीत म्हणून या दोघांना ताब्यात घेतले आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

गुजरात, पंजाब, हरियाणा आणि बिहारमधील नीट परीक्षेचे कनेक्शन याआधीच समोर आले आहे. आता यात महाराष्ट्रातील काहींचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी दोघांना लातूरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी सुरु आहे. त्यामुळे याप्रकरणी काही धागे-दोरे समोर येतात का हे पाहावं लागणार आहे.

साम टीव्हीच्या वृत्तानुसार, संजय जाधव आणि जलिल पठाण हे जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत. शिवाय ते पीएचडी धारक आहेत. ते लातूरमध्येच कोचिंग क्लासेस देखील चालवतात. नीट पेपरफुटी प्रकरणी या दोघांचा समावेश असल्याचा संशय असल्याने नांदेड एटीएसने त्यांना काल ताब्यात घेतले. यासाठी दोन ठिकाणी छापा टाकण्यात आला होता.

नीट-यूजी परिक्षेवरून देशभरात गोंधळ सुरु आहे. केंद्र सरकारला विरोधकांनी कोंडित पकडलं आहे. आज होणारी नीट-यूजीची परीक्षा सरकारला पुढे ढकलावी लागली आहे. तसेच एनटीए (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) च्या प्रमुखांची उचलबांगडी करण्यात आली आहे. पेपरफुटीप्रकरणी सीबीआय तपास करणार आहे. शिवाय हे प्रकरण सुप्रीम कोर्टात देखील गेलं आहे. एकंदरित या प्रकरणावरून बराच गोंधळ देशात पाहायला मिळतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकमध्ये खळबळ! आश्रम शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म, सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

Tamil Nadu Reservation Case : मुख्यमंत्री विजय इस्लाम स्वीकारणाऱ्यांसाठी आरक्षण देण्याच्या बाजूने, तामिळनाडू सरकारची सुप्रीम कोर्टात धाव

Latest Marathi News Live Update : मोशीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीत बचावकार्य अद्यापही सुरुच

FDA Raid on Dairy : FDA चा मोठा दणका! 1 लाख 32 हजारांचे दूध जागेवरच नष्ट; दुधात मिसळली जात होती हानिकारक पावडर, मराठवाड्यासह गुजरातला केला जात होता पुरवठा

Gold Rate Today: सोनं 5 हजारांनी महागलं! सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ; मुंबई-पुण्यात 22 कॅरेट आणि 18 कॅरेटचा भाव किती?

SCROLL FOR NEXT