Mustafa Pathan sakal
मराठवाडा

Untimely Rain : निलंगा तालुक्यात पून्हा पावसाने झोडपले; विज पडून एकाचा मृत्यू, पीकाचे नुकसान

उन्हाळ्यात पावसाळा, दररोजच्या पावसामुळे शेतकरी त्रस्त.

राम काळगे

निलंगा - गेल्या कांही दिवसापासून तालुक्यात अवकाळी पावसाने कहर केला असून सकाळी तिव्र उन्हाच्या झळा अन् दुपारनंतर पाऊस अशी स्थिती आहे. आज पुन्हा तालुक्यातील कांही भागात अवकाळी पावसाने झोडपले असून सोमवारी ता. २२ रोजी विज पडून एका शेतकऱ्यांचा मृत्यू झाला या अवकाळी पावसामुळे शेतातील पिकाचे व फळपीक, भाजीपाला याचे नुकसान झाले असले तरी उन्हाळ्यातच दररोज पावसाळा सुरू असल्याने शेतकरी सध्या त्रस्त झाले आहेत.

तालुक्यात गेल्या कांही दिवसापासून पाऊस सुरू असून या पावसामुळे शेतातील रब्बी ज्वार, गहू, कांदा, पपई, टमॕटो, आंबा यासह आदी पिकाचे नुकसान या पावसामुळे झाले आहे. तर तालुक्यातील उस्तूरी, कासारबालकुंदा, कासारसिरसी, हासोरी या भागात गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. दिवसभर कडक उन्हाची तिव्रता सायंकाळच्या सुमारास पाऊस सुरू असल्याने शेतातील कामाचा खोळंबा होत आहे.

हा पाऊस ऊस पिकासाठी पोषक असल्याचे मानले जात असाले तरी कोरडवाहू शेतकऱ्यांचे मात्र नुकसान झाले आहे. शिवाय विजेचा कडकडाट मोठा सुरू राहत असून कांही ठिकाणी विजा पडून जनावरे दगावली आहेत यामुळे थोडाही पाऊस व वारा आला की, विजा पडतील म्हणून शेतकऱ्यांत भिती निर्माण झाली आहे.

फळपीकात आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेवटी ज्वारी, गहू पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांची ज्वारी, गहू या पिकाचे नुकसान झाले आहे. सध्या अधूनमधून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी मात्र त्रस्त आहेत.

बोरसुरी येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू

निलंगा - निलंगा तालुक्यातील बोरसुरी गावातील अतिशय गरीब कुटुंबातील मजुराचा वीज पडून सोमवारी ता. २२ रोजी मृत्यू झाला आहे. बोरसुरी गावातील मुस्तफा शफीर पठाण, वय वर्ष 34, शेतावरून गावाकडे येत असताना अवकाळी पावसात 4:30 च्या सुमारास घराकडे येत असताना विज पडून मृत्यू झाला. हा तरूण गावातील तरुण, मजुरी करून खाणारा आहे. त्याच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, दोन लहान मुली असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

SCROLL FOR NEXT