Manoj Jarange Health Update Esakal
मराठवाडा

Manoj Jarange Health Update : आंदोलनाच्या चौथ्या दिवशी जरांगेंची तब्येत खालावली; मध्यरात्री अडीच वाजता उपचार सुरू

Manoj Jarange Health Update : मराठा आरक्षणप्रश्नी अंतरवाली सराटी (ता.अंबड,जि. जालना) येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती काल खालावली होती.

दिलीप दखने

मराठा आरक्षणप्रश्नी अंतरवाली सराटी (ता.अंबड,जि. जालना) येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती काल खालावली होती. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. काल वैद्यकीय उपचार, सलाईन लावण्यास त्यांनी वैद्यकीय पथकाला नकार दिला. सगेसोयऱ्यांबाबतच्या निर्णयाची अंमलबजाणी व्हावी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासह अन्य मागण्यांवर ते ठाम आहेत.

मध्यरात्री उशिरा मनोज जरांगे यांना ग्रामस्थांनी, डॉक्टर पथकांनी आग्रह केल्यामुळे मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास वैद्यकिय उपचार, सलाईन चालू करण्यात आली आहे.

मनोज जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहेत, मंगळवार ता.11 रोजी डॉक्टरांच्या पथकांनी जरांगे यांना उपचाराची गरज असल्याचे सांगितले होते, नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांनी देखील भेट घेऊन उपचार घेण्याची विनंती जरांगे यांना केली होती. आपल्या मागणीवर सरकार सकारात्मक निर्णय घेणार आहे असे सांगितले होते.

जरांगे यांचा बी.पी.शुगर, कमी होत आहे. त्यांना उपचाराची गरज आहे असे वैद्यकिय अधिकारी डॉक्टर अनिल वाघमारे, जालना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांनी सांगितले होते, या बाबत ग्रामस्थांनी मनोज जरांगे यांना विनंती, आग्रह केला व त्या नंतर सकाळपर्यंत एक सलाईन लावण्यात आली आहे.

मध्यरात्री बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगे यांची भेट घेतली. जरांगे यांच्या मागणी बाबत सरकारने तोडगा काढावा करीता उपमुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांच्या सोबत फोनवर चर्चा केली असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT