jail-full_1436353919.jpg 
मराठवाडा

अत्याचार करणाऱ्या चुलत्यास वीस वर्ष सक्त मजुरी

सकाळ वृत्तसेवा


मुखेड, (जि. नांदेड) ः चांडाेळा (ता.मुखेड) येथील एका अल्पवयीन मुलीस शेजारी राहणाऱ्या चुलत्यानेच सलग अत्याचार करून गर्भवती केल्याची घटना फेब्रुवारी 2017 मध्ये घडली होती. याप्रकरणी येथील जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश नितीन त्रिभुवन यांनी एकास वीस वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा व पाच हजार रूपयांचा दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा मंगळवारी (ता.11) सुनावली आहे.


चांडाेळा (ता.मुखेड) येथील एका गरीब कुटूंबातील पिडीत मुलगी आई नांदेड येथे आजारी असल्याने चांडाेळा येथे एकटीच राहत हाेती. शेजारीच असलेल्या चुलत चुलत्याच्या घरी सायंकाळच्या वेळी टीव्ही पाहण्यासाठी ती गेली असता एकट्या मुलीला पाहून संशयित आराेपी व्यंकट येळगे याने पिडीत मुलीसाेबत सलगी करून अत्याचार केला. यानंतर सलग दाेन अडीच महिने हा प्रकार सुरु हाेता. दरम्यान, पिडीत मुलीच्या पोटात दुखत असल्याचे तिने आई वडिलांना सांगितले असता तिला उपचारासाठी दवाखान्यात नेले असता ती गर्भवती असल्याचे दिसून आले. याबाबत चाैकशी केली असता पिडीत मुलीने शेजारी राहणाऱ्या चुलत चुलत्याने माझ्यावर अत्याचार केल्याचा प्रकार सांगितला. तेव्हा नांदेड पाेलिसांनी पिडीतेचा जबाब घेऊन मुखेड पाेलिसांत बालकांचे लैंगिक अत्याचार सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात उपनिरीक्षक विनाेद कांबळे यांनी तपास करून न्यायालयात दाेषाराेपपत्र सादर केले हाेते. 

हेही वाचा - ​ नांदेडच्या उत्पादन शुल्कने केली ५० हजाराची दारु जप्त
जिल्हा व अप्पर सत्र न्यायाधीश नितीन त्रिभुवन यांच्यासमाेर सहाय्यक सरकारी वकील महेश कागणे यांनी एकूण सहा साक्षीदारांचे म्हणने ऐकले. तसेच पिडीत मुलीचीही साक्ष याप्रकरणी ग्राह्य धरण्यात आली. न्यायालयाकडून दाेन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून बालकांचे लैगिंक अत्याचार सुरक्षा कायद्यांतर्गत आराेपी व्यंकट येळगे यास वीस वर्षाची सक्त मजुरी व पाच हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठाेठावली आहे. पैरवी अधिकारी
म्हणून सहाय्यक पाेलिस उपनिरीक्षक डी.के.कांबळे यांनी सहकार्य केले.

शीघ्रगतीच्या न्यायदानामुळे न्यायालयाचा विश्वास उंचावला 
फेब्रुवारी 2017 मध्ये दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पाेलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास करून दाेषाराेपपत्र सादर केले हाेते. तसेच न्यायालयामध्ये सुद्धा याप्रकरणी शीघ्रगतीने न्याय देण्यासाठी पुढाकार घेत पिडीतेला न्याय देण्याचा प्रयत्न झाल्यामुळे जनतेमध्ये न्यायालयाबाबतचा विश्वास उंचावल्याच्या प्रतिक्रीया जनतेतून व्यक्त होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Car Accident : ओव्हरटेकच्या नादात नादुरुस्त ट्रकवर कार धडकली; दोघे ठार, चौघे गंभीर जखमी

Pune rain forecast: पुण्यात हलक्या सरींचे पुनरागमन; उकाड्यात दिलासा, पुढील चार दिवस पावसाची शक्यता

Latest Marathi News Live Update : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा फलटण मध्ये दाखल

Water Crisis : नाशिक विभागात २८२ टँकरवर सहा लाख नागरिकांची भिस्त; अर्धा जुलै संपला, तरी तहान कायम

MLA Orders Probe: उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील गैरव्यवस्थेवर आमदार प्रवीण स्वामींचा धडक आढावा, रुग्णसेवेत तातडीने सुधारणा करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT