ED Action Jogeshwari Breweries company 
मराठवाडा

उस्मानाबाद : उमरगा येथे ‘ईडी’ ची कारवाई

जोगेश्वरी ब्रेव्हरीज कंपनीची तब्बल ४५.५० कोटी मालमत्ता जप्त केल्याची माहिती

सकाळ वृत्तसेवा

उमरगा : येथील औद्योगिक वसाहतीमधील जोगेश्वरी ब्रेव्हरीज या कंपनीच्या मालमत्तेवर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई करून ४५ कोटी ५० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. दरम्यान, या कंपनीची कोल्हापुराला नोंदणी असून, दारू निर्मिती क्षेत्रात कंपनी काम करते. 

उमरगा शहराजवळील जकेकूर शिवारातील औद्योगिक वसाहतीत कोल्हापूर येथील उमेश धोंडीराम शिंदे यांनी जोगेश्वरी ब्रेव्हरीज नावाने बिअर उत्पादन करण्यासाठी कारखान्याची उभारणी केली. मात्र, या कारखान्यातून एकही बिअरचे उत्पादन झाले नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली, तर गेली चार पाच वर्षे ही कंपनी बंद स्थितीत आहे. शुक्रवारी ईडीच्या ट्वीटर हॅंडलवरून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथील उमेश धोंडीराम शिंदे व देवेंद्र उमेश शिंदे हे पिता-पुत्र संचालक असलेली उमरगा औद्योगिक वसाहतीतील जोगेश्वरी ब्रेव्हरीज या कारखान्याची मालमत्ता व मशिनरी जप्त केली.

ही कार्यवाही मनी लॉँड्रिंग कायदा २००२ अंतर्गत केल्याचे नमूद केले आहे. कंपनी कायद्यांतर्गत ही जोगेश्वरी ब्रेव्हरीज प्रायव्हेट लिमिटेड ५ मार्च २००९ ला नोंदणीकृत आहे. त्यानुसार १५ कोटी शेअर कॅपिटल व दोन कोटी पेड कॅपिटल आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाची शेवटची बैठक ३० नोव्हेंबर २०२१ ला झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कंपनीच्या ठिकाणी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने भेट देऊन पाहणी केली असता या ठिकाणी एक रखवालदार होता. त्याचा पगार कोल्हापूर येथून होतो, अशी माहिती त्याने दिली. कंपनीला कोणत्याही अधिकाऱ्याने भेट दिली नाही आणि कंपनी सीलसुद्धा केलेली नाही असे रखवालदाराने सांगितले. परंतु, तूर्त ईडीने कागदोपत्री कारवाई केल्याने ही माहिती समोर आली आहे.

वादळी वाऱ्याने मशिनरी कोलमडली

औद्योगिक वसाहत झाल्यानंतर पहिल्यांदा या कंपनीने बांधकामासह मशिनरी उभारणीचे काम सुरू केले होते. गतीने कामही पूर्ण झाले. धान्यापासून मद्य (बिअर) निर्मिती करणाऱ्या कंपनीचे प्रॉडक्ट मात्र बाहेर आले नाही. याला बॉयलरमधील बिघाड प्रमुख कारण असल्याची माहिती सांगण्यात येते. ३१ मे २०१८ ला झालेल्या वादळी वाऱ्यात कंपनीचे मोठे नुकसान झाले. जवळपास पाच वर्षांपासून कंपनी बंद स्थितीतच आहे. कंपनीची सद्यःस्थितीतील मालमत्ता भंगार अवस्थेत दिसत आहे. यातून ४५ कोटी कसे मिळणार हा प्रश्न आहे. परंतु, ईडीच्या हाती आलेल्या पुराव्यानुसार ही कारवाई झाली असेल, यापेक्षाही आणखी माहितीचा उलगडा कालांतराने होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

Vivoचा मोठा धमाका! Vivo Y31t 5G ची किंमत झाली फक्त 24,695; Flipkart वर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी...

गर्दीत बसमध्ये चढताना धक्का लागून पडली, एसटीच्या चाकाखाली चिरडून १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू; आईच्या डोळ्यादेखत घटना

SCROLL FOR NEXT