parbhani winter weather update temperature of 8 degree c marathi news sakal
मराठवाडा

Parbhani Weather Update : परभणीकर गारठले ; तापमान ८.५ अंश सेल्सिअस

मराठवाड्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद

गणेश पांडे

परभणी : जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. परभणीत शुक्रवारी (ता.२२) ८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हे मराठवाड्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.

मागील पाच-सहा दिवसांमध्ये किमान तापमान १५ अंशाच्या आतच आले आहे. हुडहुडी भरेल, असा वातावरणात गारवा निर्माण झाल्याने थंडीमध्ये दररोज वाढ होत आहे. परभणी शहर परिसरात मंगळवारी (ता.१९) किमान तापमान १२.९ अंश सेल्सियस नोंद झाले होते.

त्यानंतर सातत्याने तापमानाचा पारा खाली उतरत गेला आहे बुधवारी शहराचे तापमान १०.३ गुरुवारी १०.८ अंश सेल्सिअस इतके नोंदवल्या गेले.जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून बदलत्या वातावरणाने सर्दी, ताप, खोकला, अंगदूखी यासह विविध आजारांनी डोकेवर काढले आहे. पहाटे, सकाळी आणि रात्रीच्या वेळी थंडीची लाट निर्माण झाली आहे.

शुक्रवारी परभणीचे तापमानात सर्वात जास्त घट दिसून आली. शुक्रवारी तापमान ८.३ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी नोंदवल्या गेले. त्यामुळे परभणीकरांना हिवाळ्यात तापमानातील चढ-उतार अनुभवायला मिळत आहे.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात फारशी थंडी नव्हती. पहाटेच्या वातावरणात गारठा निर्माण होत आहे. दरम्यान, यावर्षीचे सर्वात कमी तापमान शुक्रवारी ८.३ अंश नोंद झाले असल्याची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा केंद्राने घेतली आहे.

पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यताप्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईच्या प्राप्त अंदाजानुसार जिल्ह्यात पुढील तीन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात पुढील तीन दिवस फारशी तफावत जाणवणार नाही. तर २२, २३ डिसेंबरला किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फुल ड्रामा! तिसऱ्या अम्पायरने फलंदाजाला OUT दिले, सहकारी डग आऊडमध्ये 'आंदोलना'ला बसले; पुढे जे घडले त्याने सारेच चक्रावले

काय? सेलेब्रिटींसोबत दिसणारा ऑरी करतो लाखोंच्या घरात कमाई? एका रीलसाठी घेतले ७६ लाख; म्हणतो- गेल्याच महिन्यात...

Pune Crime : पुण्यात संतापजनक घटना ! पोटच्या मुलांनीच वृद्ध आई-वडिलांना जमिनीसाठी भररस्त्यात दांडक्याने केली मारहाण, घटनेचा व्हिडिओ समोर

आजचे पंचांग २ सप्टेंबर २०२६! राहुकाळ, मुहूर्त, तिथी आणि नक्षत्र जाणून घ्या

“गणा धाव रे…” सनई चौघडे’च्या टीमचा कोकणात बाल्या डान्स; Viral Video

SCROLL FOR NEXT