Beed Crime News sakal
मराठवाडा

Beed Crime News : दरोड्याच्या तयारीतील टोळी पोलिसांनी पकडली ; तिघे ताब्यात, चौघे फरारी; ट्रकही जप्त

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी ट्रकमधून साहित्य घेऊन आलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. पाली (ता. बीड) परिसरात मंगळवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

बीड : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी ट्रकमधून साहित्य घेऊन आलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. पाली (ता. बीड) परिसरात मंगळवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. ट्रक ताब्यात घेऊन तिघांना बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. फरारी चार संशयितांचा शोध सुरु आहे.

पवन आश्रुबा कोळी (वय ४८, रा. पारा, ता. वाशी, जि. धाराशिव) याच्यासह दोन विधीसंघर्षग्रस्त मुलांचा पकडलेल्या संशयितांत समावेश आहे. सचिन आबाराम काळे ऊर्फ आबा रामा काळे (रा. बकरवाडी, ता. वाशी, जि. धाराशिव), मुरली देविदास ऊर्फ पिंट्या शिंदे, दत्ता गोवर्धन शिंदे, राघव ऊर्फ दगल्या आबा शिंदे ( सर्व रा. पारा, ता. वाशी, जि. धाराशिव) हे अट्टल दरोडेखोर आहेत.

दरोड्याच्या तयारीने ते ट्रकसह पाली शिवारात आल्याची माहिती बीड स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पवन कोळी, दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले. तर इतर संशयित फरारी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT