Beating Sakal
मराठवाडा

पान द्यायला झाला उशीर,मुजोर पोलिसांनी रिक्षाचालकाला बेदम मारले

सकाळ डिजिटल टीम

उस्मानाबाद : पोलिसाने एका रिक्षाचालकास जबर मारहाण केल्याची घटना उस्मानाबादेत (Osmanabad) घडली आहे. या प्रकरणी येथील आनंदनगर पोलिस ठाण्यात (Police Violence) पोलिस निरीक्षकासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर मंगळवारी (ता.२४) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षाचालक फरीद इस्माईल शेख (रा.विकास नगर) हे लातूर रस्त्यावरील पानटपरीजवळ थांबले असता आनंदनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश चव्हाण, पोलिस कर्मचारी मुक्रम पठाण आले. पठाण यांनी फरीदला पान खाऊ घाल, असे सांगितले. मात्र पानवाल्याकडून पान द्यायला उशीर झाल्याने (Crime In Osmanabad पठाण याने अर्वाच्य भाषा वापरण्यास सुरुवात केली. फरीदने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता पोलिस कर्मचारी पठाण याने त्यालाही शिवीगाळ केली व त्याला पोलिस वाहनात बसवले. पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक चव्हाण, पठाण व अन्य एकाने फरीदला लाथाबुक्यांनी मारहाण केली.

यावेळी फरीदचा भाला आला. त्याने या घटनेचा व्हिडिओ चित्रीत केला. यानंतर फरीदला पोलिसांनी सोडले. या प्रकरणी फरीद यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली. मात्र ती नोंदविण्यास नकार देण्यात आली. फरीद यांनी उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन यांच्याकडे धाव घेतली. तिलक यांनी कारवाईच्या सूचना दिल्यानंतर जखमी फरीद यांची जबाब नोंदविली. या प्रकरणी आनंदनगर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक सतीश चव्हाण, मुक्रम पठाण व अन्य एका पोलिस कर्मचाऱ्यावर मारहाण, शिवीगाळ केल्याप्रकरण गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijeta Dahiya: कोण आहेत विजेता दहिया? बर्गर खाल्ल्यामुळे 'सीजेपी'चं प्रवक्तेपद गमावलं, व्हिडीओ झाला होता व्हायरल

Mulshi Dam Water : मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत ८ हजार १०० क्यूसेक्सने विसर्ग सुरू.....

Pune Water Supply : पुण्यात पाणी कपात नाही! महापौर मंजूषा नागपुरेंची घोषणा

CJP च्या 'जंतरमंतर'वरील आंदोलनाने वेधले लक्ष! रोहित शर्मा, सूर्या आणि बुमराहच्या पत्नींची प्रतिक्रिया चर्चेत

Sonam Wangchuk: 'या' अटी मान्य झाल्यास उपोषण सोडेन; रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचे सरकारला पत्र, तोडगा निघणार?

SCROLL FOR NEXT