Police, Latur News  
मराठवाडा

सावधान ! आता दुचाकी जप्त होणार, विनाकारण फिरणाऱ्यांवर लातूर पोलिसांची कारवाई

सुशांत सांगवे

लातूर  : संचारबंदी लागू असतानाही तुम्ही विनाकारण दुचाकी घेऊन रस्त्यावर फिरत असाल तर तुमची दुचाकी जप्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पोलिसांनी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शहरात सोमवारपासून (ता.३०) लागू झाली आहे. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना आणि अतिमहत्त्वाच्या कामांसाठीच बाहेर पडलेल्यांना या कारवाईतून वगळले जाणार आहे.


घराबाहेर पडू नका, असे वारंवार सांगूनही संचारबंदी पाहण्यासाठी तरूणाई मोठ्या प्रमाणात बाहेर पडताना दिसत आहे. विशेषत: सकाळी आणि संध्याकाळी रस्त्यावर वाहनांची गर्दी दिसत आहे. पोलिसांनी दंडूका उगारला तरी विनाकारण बाहेर फिरणारे अजूनही दिसू लागले आहेत. घराबाहेर पडू नका, असे आवाहन सर्व स्तरातून होत असले तरी तेही धुडकावून लावले जात आहे. त्यातच पोलिसांनी आपली काठी खाली टेकवली आहे. त्यामुळे बाहेर फिरण्यासाठी अनेकांना आणखीन बळ मिळाले आहे.


पोलिसांनी अडवल्यानंतर भाजीचे किंवा किराणा सामानाचे कारण पुढे केले जात आहे. प्रत्येकाकडूनच ही कारणे पोलिसांनी ऐकावी लागत आहेत. काहीजण तर आपल्या लहान मुलांना बाहेर फिरायला घेऊन येत आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण आणखी वाढत चालले आहे. रस्त्यावरील गर्दीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांची दुचाकी जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनी ‘सकाळ’ला दिली. नागरिक रस्त्यावर येऊ नयेत म्हणून शहराच्या प्रत्येक भागात पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. शंभर गृहरक्षकांचीही मदत घेण्यात आली आहे. विनाकरण बाहेर पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले.


सातारा, कोल्हापूर, नाशिक, रत्नागिरी, कराड या शहरांमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांच्या दुचाकी जप्त करण्याची कारवाई पोलिसांनी केली आहे. या शहरांत गेल्या पाच-सहा दिवसांपासून ही कारवाई सुरू असून आत्तापर्यंत अनेक दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत, अशीच कारवाई आता लातूरात होणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील दुचाकींची संख्या कमी होईल, असेही पोलिसांकडून सांगितले जात आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Rain Forecast : ...अखेर मान्सून केरळमध्ये दाखल; विदर्भात पुढील 10-12 दिवस कसं असेल हवामान? यंदा 90 टक्के पावसाचा अंदाज

Lalit Modi: हा कसला मूर्ख खेळ आहे?’ सचिन द्रविडसह दिग्गजांनी २००७ च्या T20 World Cup ला दिला होता नकार, ललित मोदींचा खुलासा..

Numerology : टॉम अँड जेरीसारखे असतात 'या' 3 मुलांकाचे लोक; तुझं-माझं जमेना अन् तुझ्याविना करमेना, शेवटच्या श्वासापर्यंत टिकतं नातं

Chardham Yatra: बद्रीनाथ-केदारनाथ मंदिरासमोर 'छैंया-छैंया' गाण्यावर डान्स! मंदिर समिती अ‍ॅक्शन मोडमध्ये, VIP दर्शनासाठी नवी SOP जाहीर

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये गणेश गीते आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांची बैठक सुरू

SCROLL FOR NEXT