rain rain
मराठवाडा

Marathwada Rain Update: पिकांसह शेतकऱ्यांचे चेहरेही टवटवीत

या पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीनसह इतर पिकांना जीवदान मिळाले.

सकाळ वृत्तसेवा

या पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीनसह इतर पिकांना जीवदान मिळाले.

औरंगाबाद: मोठ्या खंडानंतर नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्‍ह्यातील काही भागात पाऊस झाला. या श्रावणसरीमुळे पिकांसह शेतकऱ्यांचे चेहरेही टवटवीत झाले. परभणी जिल्ह्यात रविवारी (ता.१५) रात्री पावसाचे आगमन झाले. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. दरम्यान, या पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीनसह इतर पिकांना जीवदान मिळाले.

हिंगोली जिल्ह्यात सोमवारी (ता. १६) भल्या पहाटे पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाला. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातील काही भागात सोमवारी (ता. १६) रात्री रिमझिम पाऊस झाला.

तीन जिल्ह्यांत प्रतीक्षाच
बीड, जालना आणि उस्मानाबादमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अनेक दिवसांपासून पाऊस नसल्याने खरीप पीक सुकले आहे. त्यामुळे आता पाऊस आला तरी उत्पन्नात घट होणार हे निश्चित आहे. पण, तीन-चार दिवसांत पाऊस झाला नाही तर पीक हातचे जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal to Hubli Highway Closed : कागल ते हुबळी महामार्ग बंद, कोल्हापूर आयजी रंजनकुमार शर्मा यांनी सांगितला पर्यायी मार्ग; शेतकरी संघटनांची भूमिका काय?

ट्रम्पना पती म्हणाली नवी प्रेस सेक्रेटरी, चूक लक्षात येताच केली मिश्किल टिप्पणी; VIDEO VIRAL

Maharashtra Live News : "मी कोणतंही बटण दाबलं नाही!" एअर इंडियाच्या वैमानिकाचा दावा

Pune IT Engineers Viral Story : महिन्याला १ लाखांहून अधिक पगार, तरी वीकेंडला रॅपिडो चालवतात; पुण्यातील IT इंजिनिअर्सची कमाई पाहून वाटेल आश्चर्य

दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये पाठवणार, आणखी ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT