Crime News esakal
मराठवाडा

Beed Crime : दीड महिन्याच्या बाळाला जमिनीवर आपटून मारहाण! 11 जणांवर जीवघेणा हल्ला; दरोड्याच्या घटनेने हादरला बीड जिल्हा

Robbery in Beed Marathi Crime News : घरातील बाळांतीण व दीड महिन्याच्या तान्ह्या बाळाला ओलीस धरून दागिने, सोने, पैसे कुठे आहेत सांग असे धमकावत दहा बारा दरोडेखोरांनी धारधार शस्त्राने मारहाण केली

रोहित कणसे

बीड जिल्ह्यातून दरोड्याच्या घटनेची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील केरूळ गावातील भागवत वस्तीवर मध्यरात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला आहे. या घटनेत तब्बल 11 जणांवर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला असून यात दीड महिन्याच्या तान्ह्या बाळालाही जमिनीवर आपटून मारहाण करण्यात आली आहे. यात भागवत कुटुंबातील 9 व्यक्ती व 3 बालक गंभीर जखमी झाले आहेत.

घरातील बाळांतीण व दीड महिन्याच्या तान्ह्या बाळाला ओलीस धरून दागिने, सोने, पैसे कुठे आहेत सांग असे धमकावत दहा बारा दरोडेखोरांनी धारधार शस्त्राने मारहाण केली. यावेळी प्रतिक्रार केला तर धारधार चाकूने वार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तर जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्यामुळे भागवत कुटुंबीय प्रचंड भयभीत झाले. या घटनेतील जखमी व्यक्तींनी रात्री घडलेली आप बीती सांगितली असून ती थरकाप उडवणारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT