सुलतानपूर जवळील नाईकवाडे वस्तीवर दरोडा; चार लाखांचा ऐवज लंपास esakal
मराठवाडा

सुलतानपूर जवळील नाईकवाडे वस्तीवर दरोडा; चार लाखांचा ऐवज लंपास

पाच महिन्यांपूर्वी २२ जून रोजी पुतणे रामदास नाईकवाडे यांचे चौसाळा येथे असलेल्या हॉटेल येथे चोरी

सकाळ वृत्तसेवा

चौसाळा (जि. बीड) : बीड तालुक्यातील चौसाळा येथून जवळच असलेल्या सुलतानपूर शिवार हद्दीतील चौसाळा - पाटोदा या राज्यमार्गावर असलेल्या नाईकवाडे वस्ती वर राहत असल्या अशोक नाईकवाडे यांच्या घरी मंगळवार (ता. ८) रोजी मध्यरात्री साडेतीन च्या दरम्यान दरोडा पडला असून यामध्ये साडेचार तोळे सोने व रोख एक लाख पन्नास हजार असा जवळपास चार लाखांचा ऐवज सहा चोरट्यांनी लुटला असून चोरट्यांनी मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून नाईकवाडे यांची मुलं राहत असलेल्या शेजारच्या खोलीचे कुलूप तोडत असताना चोरट्यांना प्रतिकार करत असताना अशोक नाईकवाडे (वय : ५० वर्ष) यांच्या डोक्यावर टॉमीने वार केला. त्यामध्ये त्यांच्या कानाचा वरचा भाग तुटला असून ते जखमी झाले आहेत. सदरील घटनेनंतर वस्ती वरील नागरिकांनी नाईकवाडे यांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

सदरील घटनेची माहिती मिळाल्यानंतर चौसाळा पोलीस चौकीचे कर्मचारी, चौसाळा शहरात गस्ती पथकात असलेले सरपंच मधुकर तोडकर, ग्रामरक्षा दलातील गस्तीवरील तरुण आदींनी नाईकवाडे वस्तीवर येऊन नाईकवाडे कुटुंबास आधार दिला. सकाळी नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांनी भेट दिली. व तपासाच्या दृष्टीने चक्र फिरवले तसेच दिवसभरात काही संशयितांना ताब्यात घेतले होते. परंतू त्यांना नंतर सोडून दिले अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांनी दिली. दिवसभरात नाईकवाडे वस्तीस एल. सी. बी. पथक बीड आदींनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. तसेच पाच महिन्यांपूर्वी २२ जून रोजी अशोक नाईकवाडे यांचे पुतणे रामदास नाईकवाडे यांचे चौसाळा येथे असलेल्या हॉटेल आर्यन येथे चोरी झाली होती त्या घटनेत दोन लाख वीस हजार रुपयांची रोकड चोरी झाली होती. त्याचा ही अद्यापपर्यंत तपास लागलेला नाही.

चौसाळा व परिसरात चोऱ्यांची मालिका कायम सुरूच आहे अद्यापपर्यंत कुठल्याही चोरीचा तपास लागलेला नाही. अनेक दुचाकी ही या भागातून चोरी गेल्या आहेत. आतापर्यंत परिसरात झालेल्या चोऱ्या, दरोडे, रॉबरी यापैकी फक्त चौसाळा बायपास वरील फक्त त्या दुर्दैवी रॉबरीचा तपास सोडता कुठल्याच तपासाला पोलीसांना यश आले नाही. त्यामुळे नेकनूर पोलिसांच्या कार्यपद्धती वर नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

सदरील घटना अतिशय गंभीर असून आमच्या नाईकवाडे वस्तीवर भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून चौसाळा परिसरात अनेक चोऱ्यांच्या घटना घडत आहेत. कुठलाही तपास लागत नाही. पाच महिन्यांपूर्वीच माझ्या चौसाळा येथील हॉटेल आर्यन वर चोरी झाली होती. त्याचा आणखी तपास लागला नाही. सदरील दरोड्याचा चार दिवसांत तपास न लागल्यास बीड - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौसाळा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. - रामदास नाईकवाडे, नाईकवाडे वस्ती.

सदरील घटने प्रकरणी दिवसभरात परिसरातील काही संशियीतांना तपासासाठी ताब्यात घेतले होते. चौसाळा व परिसरात गस्ती पथक, ग्रामरक्षा दल यांच्याकडून दररोज रात्रीची गस्त सुरू आहे. नागरिकांनी घाबरू नये. चौसाळा बायपास वरील रॉबरीचा तपास लावला तसा या घटनेचा तपास ही लवकरच लावला जाईल. - मुस्तफा शेख ( सहाय्यक पोलीस निरीक्षक नेकनूर पोलीस स्टेशन)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anantnag Attack: जम्मू-काश्मीर पुन्हा हादरलं! अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला; पोलीस जवान शहीद, हल्ल्याची जबाबदारी कुणी स्वीकारली?

CJP Protest Delhi : आता चर्चा जंतर मंतरवरच! अन्यथा...; CJPची मोठी अट, काय म्हणाले?

Live Updates Marathi : पाटणात कॉंग्रेस कार्यालयाबाहेर भाजपचे आंदोलन, कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप

भारतीय संघात स्थान मिळत नाही म्हणून, कुलदीप यादवने निवडली दुसरी वाट! आता 'या' परदेशी संघासाठी खेळणार पाच वन डे सामने

Loni Kalbhor Accident: भरधाव ट्रकने धडक दिल्याने ७२ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी; चालकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT