sambhaji patil nilangekar sambhaji patil nilangekar
मराठवाडा

'महापालिकेच्या निवडणुकीत भाजप देणार ऐंशी टक्के तरुणांना संधी'

या निवडणुकामध्ये 21 ते 35 वयोगटातील व सामान्यातला सामान्य गटातील 80 टक्के तरूणांना संधी देणार असल्याची घोषणा माजीमंत्री व आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी येथे केली

सकाळ वृत्तसेवा

या निवडणुकामध्ये 21 ते 35 वयोगटातील व सामान्यातला सामान्य गटातील 80 टक्के तरूणांना संधी देणार असल्याची घोषणा माजीमंत्री व आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी येथे केली

लातूर: भाजपा युवा मोर्चा व युवा वॉरियर्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संघटन निर्माण केलेले आहे. सामाजिक कार्यामध्ये तरुणांचीच फळी सक्रियपणे काम करीत आहे. या तरूणांच्या संघटनाच्या जोरावर आपण काम करीत आलेलो आहोत. त्यामुळे या कार्यकर्त्यांना काम करताना खाली मान घालण्याची वेळ येऊ देणार नाही. येत्या काही महिन्यावर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकामध्ये 21 ते 35 वयोगटातील व सामान्यातला सामान्य गटातील 80 टक्के तरूणांना संधी देणार असल्याची घोषणा माजी मंत्री व आमदार संभाजी पाटील निलंगेकर (sambhaji patil nilangekar) यांनी येथे केली.

येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा व महात्मा बसवेश्‍वर मंडल युवा मोर्चाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात युवकांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेश कार्यकारीणीचे निमंत्रित सदस्य माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, शैलेश लाहोटी, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, सरचिटणीस मनिष बंडेवार, महानरगपालिकेचे सभागृह नेते शैलेश गोजमगुंडे, माजी उपमहापौर देविदास काळे, स्थायी समितीचे सभापती दीपक मठपती, भाजयुमोचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर उपस्थित होते. जिल्ह्यात ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोनाच्या काळात अनेकांचा मृत्यू झाला. रेमडेसिव्हीरचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. याला विद्यमान पालकमंत्रीच जबाबदार आहेत, अशी टीका त्यांनी केली.

यावेळी युवा वॉरियर्सच्या 14 शाखांच्या पदाधिकार्‍यांना नियुक्‍तीपत्रांचे वाटप करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक सुरक्षा समितीच्या अध्यक्षपद मिळाल्यामुळे भारताचा प्रभाव वाढलेला आहे, असे मत श्री. कव्हेकर यांनी व्यक्त केले. बुथ पॅटर्नमुळे महपालिकेत भाजप झिरो टू हिरो झाली. त्यामुळे यापुढील कालावधीतही शहरामध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बळावर आणखी बुथ मजबूत करून हा पॅटर्न पॅटर्न राज्यात निर्माण करु, असा विश्‍वास मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी व्यक्‍त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अब्दुल गालिब शेख यांनी केले तर आभार भाजयुमोचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश गोजमगुंडे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT