फोटो 
मराठवाडा

धक्कादायक...! चोरांकडून २९ दुचाकी जप्त  

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहराच्या गर्दीच्या ठिकाणाहून दुचाकी चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी अटक केली. त्यांच्याकडून तब्बल विविध कंपनीच्या चोरलेल्या २९ दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांच्या पथकाने रामतिर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (ता. सात) केली. 

शहराच्या विविध भागातून दुचाकी मालकांचे लक्ष हटताच त्यांची दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. यामुळे वाहनधारकांत भितीचे वातावरण पसरले आहे. दुचाकी चोकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी आपल्या अधिनस्त पोलिस अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांनी आपल्या पथकाला सोबत घेऊन शहरातील दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी गस्त सुरू केली. 

तिन चोरट्यांकडून २९ दुचाकी जप्त

श्री. पांडूरंग भारती यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून बिलोली तालुक्यातील अजनी येथे राहणारा शेषराव रामा गावडे (वय ३०) याला त्यांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेली दुचाकीब्दल विचारले असता त्याने आपला मित्र दिलीप अशोक कांबळे (वय २१) आणि माधव मारोती गावडे (वय २०) यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्याला विश्‍वासात घेऊन पोलिस पथक दिलीप व माधवपर्यंत पोचले. या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी चोरलेल्या विविध कंपनीच्या तब्बल नऊ लाख ४० हजाराच्या दुचाकी काढून दिल्या. यात पॅशन प्रो, स्प्लेंडर, डिसकव्हर, युनिकॉर्न, होंडा शाईन आणि एक बुलेट अशा गाड्यांचा समावेश आहे. या कारवाईतील सर्व मुद्देमाल व तीन्ही दुचाकी चोरांना रामतिर्थ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. एपीआय पांडूरंग भारती यांच्या फिर्यादीवरून रामतिर्थ पोलिस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथे क्लिक करानिवासस्थाने नटली पदाधिकाऱ्यांच्या दिमतीला
 
दिलीप कांबळे सराईत दुचाकी चोर 

यातील दिलीप कांबळे हा सराईत दुचाकी चोर असून त्याच्यावर पूणे जिल्ह्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून आणखी काही दुचाकी चोरीच्या घटना तपासात पुढे येण्याची शक्यता श्री. भारती यांनी वर्तविली आहे. या पथकात सहाय्यक फौजदार जसवंतसिंग शाहु, हवालदार मारोती तेलंग, सखाराम नवघरे, तानाजी येळगे, बजरंग बोडके, विलास कदम, संजय जिंकलवाड, गणेश धुमाळ यांनी परिश्रम घेतले. पोलिस अधीक्षक श्री. मगर यांनी पथकाचे कौतुक केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकमधील कुंभमेळ्यावर कोट्यवधींचा खर्च, मात्र राज्यातल्या मराठी १२५ शाळा बंद; SC न्यायमूर्तींनी सुनावले खडे बोल

Maratha Reservation: जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत; मंत्री विखे पाटील, सामंत, देसाईंची चर्चा

Duleep Trophy 2026 : इशान किशनची यष्टीमागे कमाल; वाऱ्याच्या वेगाने केली स्टम्पिंग Video Viral; शाहबाज, घरामीची शतकं...

Marathi News Live Updates : भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी तेलंगणातील हैदराबाद येथील टाटा लॉकहीड मार्टिन एरोस्ट्रक्चर्स लिमिटेड प्रकल्पाला भेट दिली

‘चॅनेलमधल्या कुणाचातरी राग...’ दयाने सांगितलं CID बंद होण्याचं खरं कारण; म्हणाला-

SCROLL FOR NEXT