st bus  sakal
मराठवाडा

ST Bus : मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे कष्टकरी जनसंघाच्या संपाला कळंबच्या आगारातील कर्मचाऱ्यांची नकार घंटा

त्यामुळे कळंबच्या आगारातील सर्व मार्गावरील बस वाहतूक सुरळीत सुरू राहण्याची शक्यता आहे.

दिलीप गंभिरे

कळंब - ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा एसटी कष्टकरी जनसंघाचे नेते गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली सोमवार (ता. ६) पासून आझाद मैदानात पुन्हा आंदोलन होत आहे. त्यामुळे आंदोलनास येथील एसटीच्या कळंब आगारातील जवळपास १०० टक्के कर्मचाऱ्यांचा पाठिंबा नसल्याची माहिती मिळत असून अद्यापही एक ही कर्मचारी यांची संपावर जाणार आहेत असे लेखी कळविले नाही.

त्यामुळे कळंबच्या आगारातील सर्व मार्गावरील बस वाहतूक सुरळीत सुरू राहण्याची शक्यता आहे.दरम्यान सदावर्ते यानी मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशी भूमिका व बँकेच्या कारभारावर कर्मचारी नाराज असल्याने संप उधळून लावण्यासाठी कर्मचाऱ्यांनीच आता कंबर बांधली आहे.एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याच्या विविध मागण्यासाठी गेल्यावर्षी आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे कष्टकरी जनसंघाचे नेते सदावरते चांगलेच चर्चेत आले होते.

त्यांनी महामंडळाची बँक ही ताब्यात घेतली. त्यामुळे कळंब आगारातील मोठ्या प्रमाणत कर्मचारी बाजूने होते. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सदावर्ते यानी आपली भूमिका विरोधात मांडल्याने कर्मचाऱ्यांत संतापाची लाट आहे. शिवाय बँककडून कर्मचाऱ्यांची आर्थिक छळवणूक करण्यात आली.त्यामुळे येथील एसटीच्या कळंब आगारातील ९९ टक्के कर्मचारी नाराज आहेत. त्यामुळे सोमवारी पुकारलेल्या संपात आगारातील एकाही कर्मचाऱ्यांनी संपावर जाणार आहे किंवा नाही याबाबत लेखी कळविले नाही. त्यामुळे कळंब आगारातील सर्व मार्गावर एसटी बसेस धावणार असल्याची माहिती आगारातील चालक, वाहक यानी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

कर्मचाऱ्यांत नाराजी

दरम्यान कळंब आगारातील अनेक कर्मचाऱ्यांना संपावर जाणार आहात का? असे प्रश्न उपस्थित केला असता सदावर्ते यानी मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मुद्यावर विरोधी भूमिका घेवून मोठी घोडचूक केली. आता आगारातील चालक वाहक अथवा कोणीही कर्मचारी बाजूनं राहणार नसून एसटी बसची वाहतूक सुरळीत सुरू रहाणार असल्याचे सांगण्यात आले.

कळंबची बस सेवा सुरू राहणार

एसटी महामंडळाच्या कळंब आगारातील चालक, वाहक आदी कर्मचाऱ्यांनी संपावर जाणार आहे किंवा नाही असे आगाराला अद्यापही लेखी कळविण्यात आलेले नाही. त्यामुळे कर्मचारी संपावर जाण्याचा प्रश्नच उद्दभवत नाही. त्यामुळे एसटीच्या कळंब आगारातील बसेसची सेवा सर्व मार्गावर सुरळीत राहणार आहे. बालाजी भारती प्रभारी आगार प्रमुख कळंब.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT