ST bus sakal media
मराठवाडा

St Strike : हिंगोली जिल्ह्यात एसटीचे ६२ कर्मचारी निलंबित

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत व कळमनुरी येथील एसटी आगारातील कर्मचाऱ्यांचा २९ व्या दिवशीही संप सुरुच आहे.

राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील हिंगोली, वसमत व कळमनुरी येथील एसटी आगारातील कर्मचाऱ्यांचा २९ व्या दिवशीही संप (St Workers Strike) सुरुच आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता शासनाने कर्मचाऱ्यांना कामावर येण्याच्या सूचना देऊन देखील आदेशाचे पालन केले नसल्याने विभागीय आगाराने जिल्ह्यातील तिन्ही आगारांतील ६२ कर्मचारी रविवारी (ता. २८) रात्री उशिरा निलंबित केले आहेत. दरम्यान रोजंदारीवरील दोन चालकांची सेवासमाप्ती केली असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत जिल्ह्यातील तिन्ही आगारातून निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या आता ९२ झाली आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे राज्य शासनात विलीन करण्यात यावे , या मागणीसाठी एक नोव्हेंबरपासुन लढा विलिनीकरणाचा सुरु केला आहे. याच महिन्यात सुरवातीला जिल्ह्यातील हिंगोली, वसमत (Vasmat) व कळमनुरी (Kalamnuri) या तीन आगारांतून विभागीय कार्यालयाच्या सूचनेनुसार प्रत्येकी दहा कर्मचारी निलंबित केले होते. तरीही जिल्ह्यातील कर्मचारी मागण्या मंजूर करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.

रविवारी रात्री उशिरा शासनाच्या आदेशानुसार विभागीय कार्यालयाने हिंगोली आगारातील यांत्रिकी विभागातील पाच, चालक बारा व वाहक तीन असे वीस वसमत आगारातील चालक अकरा, वाहक नऊ, तर कळमनुरी आगारातील चालक १५ आणि वाहक पाच असे एकूण ६२ कर्मचारी निलंबित केले. मात्र याला न जुमानता कर्मचारी मागण्या मान्य करण्याच्या निर्णयावर ठाम असुन संप सुरुच आहे.

शासनाने कर्मचाऱ्यांना संपात सहभागी न होता कामावर येण्याच्या सुचना दिल्या आहेत. मात्र कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. कामावर न येणाऱ्यावर विभागीय कार्यालयाने निलबंनाची कारवाई सुरू केली आहे.

- संजय पुंडगे, आगारप्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT