succeed to gorakshak strike markets shut down in support​ Illegal slaughterhouse seals Sakal
मराठवाडा

Gangapur News : गोरक्षक दलाच्या उपोषणाला यश : समर्थनार्थ व्यापारी बाजारपेठ कडकडीत बंद

पालिका प्रशासनातर्फे शहरातील बेकायदेशिर कत्तलखाना सील

बाळासाहेब लोणे

गंगापूर : गोरक्षक दलाच्या उपोषणाला अखेर यश आले असून, पालिका प्रशासनातर्फे शहरातील बेकायदेशिर कत्तलखाना सील करण्यात आला आहे. गोरक्षक दलाचे पदाधिकारी मागील चार दिवसापासून पालिकेच्या प्रांगणात उपोषण करत होते. प्रशासनाच्या निषेधार्थ गुरुवारी (ता. १९) शहरवासीयांनी कडकडीत बंद ठेवला होता.

तसेच सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी देखील दसर्यापर्यंत कारवाई केली नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. शुक्रवारी (ता. १९) देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराज, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महेंद्र गुंदेचा यांच्या उपस्थितीत प्रशासनाच्या मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांनी कारवाई करत उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिले आहे.

त्यात गोवंश हत्येच्या बंदीसाठी सर्व विभागाची समिति स्थापन करण्यात आली आहे तसेच गोहत्या झाल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करणार व सील केलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असल्याचे सांगितले आहे.

उपोषणकर्ते चंद्रकांत लांडे, श्रीकांत नावंदर, योगेश नाबरिया, राधेश्याम कोल्हे , गणेश पुराणिक, पृथ्वी पवार यांना लिंबू सरबत देऊन उपोषण सोडविण्यात आले आहे. आंदोलन यशस्वीतेसाठी गोसेवेचे प्रांत प्रमुख मनीष वर्मा,

अतुल रासकर, श्रीराम नावंदर मंगेश जोशी, तेजस सोनवणे, राजशेखर किरण, महेश मुंदडा यांनी प्रयत्न केले. उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले व मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळो मोठ्या संखेने गोसेवाक उपस्थित होते.

श्रीकांत नावंदर यांची प्रकृती स्थिर मागील चार दिवसापासून उपोषणकर्ते श्रीकांत नावंदर यांची शुगर कमी झाल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. माझ्यावर उपचारा करायचे असतील तर उपोषणस्थळीच करा असा आग्रह त्यांनी धरला होता. सकाळी शहरातील डॉ. साजिद शेख तपासणी करून उपोषणस्थळीच उपचार केले त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayan Ahmed: एक सल्ला, नंतर 'तो' मॅसेज अन् सापळा... अयान अहमदनं तरुणींना जाळ्यात कसं ओढलं? पडद्यामागचा सल्लागार लव्हगुरू कोण?

Latest Marathi News Live Update: TSC कंपनीला महिला आयोगाचे सदस्य देणार भेट

KCC Campaign : पशुपालकांसाठी खुशखबर! 'किसान क्रेडिट कार्ड'वर मिळणार ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; राज्य शासनाची विशेष 'KCC' मोहीम

Cricket Viral Video: IPL काय बघताय? इथे तर पठ्ठ्याने मैदानावरच नांगर फिरवला; सामना थेट बंद! खेळाडू, रेफरी अन् प्रेक्षक हैराण

SRH vs CSK: चेन्नईच्या संघात मोठा बदल होणार! स्पर्धेतून बाहेर झालेल्या खलील अहमदची जागा घेण्यासाठी ४ खेळाडूंचे पर्याय

SCROLL FOR NEXT