Killary Sakal
मराठवाडा

किल्लारी परिसराला जानवला भूकंपाचा सौम्य धक्का

बऱ्याच दिवसानंतर शनिवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास किल्लारीसह परिसरातील पाच किलोमीटर अंतरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला

विश्वनाथ गुंजोटे

किल्लारी : बऱ्याच दिवसानंतर शनिवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास किल्लारीसह परिसरातील पाच किलोमीटर अंतरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. पहाटे दोन वाजून सहा मिनिटाला औसा तालुक्यातील किल्लारीसह परिसरातील कारला, कुमठा, सिरसल, येळवट, मोगरगा, तळणी, नदीहत्तरगा ( ता. निलंगा ) या परिसरामध्ये २.४ रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.

अनेकांना जमीन हादरल्याने जाग झाली. जमिनीखालून एखादी रेल्वे धावत जावे अशा पद्धतीचा भास या सौम्य धक्क्याने नागरिकांना झाला. पत्र्याच्या शेडमध्ये आवाज घुमू लागला. ज्यांना रात्री जाग झाली त्यांनी रात्र जागून काढली. या भागाला भूकंप हा नेहमीचाच झाला आहे. वर्षातून किमान एक ते दोन वेळा असे भूकंपाचे सौम्य  धक्के या भागामध्ये जाणवतात. शासनाने भूकंपापासून बचावासाठी अधिकची उपायोजना करणे अपेक्षित आहे.

(( भूकंप झाल्याची नोंद घेण्यासाठी नवीन मशिनरीद्वारे तंतोतंतू नोंद होत आहे.  रात्री झालेल्या भूकंपाची २.४ रिस्टर स्केल अशी नोंद झालेली आहे. हा भूकंपाचा सौम्य धक्का समजला जातो. यात नुकसान होण्याची प्रमाण अत्यल्प असते.

युवराज पाटील, जिल्हा माहिती अधिकारी लातूर.))

वाचमेनवर चालतो भूकंपमापक इमारतीचा कारभार,

३० सप्टेंबर १९९३ च्या महाप्रलयंकारी भूकंपानंतर पुनर्वसनामध्ये भूकंपमापक यंत्राद्वारे नोंद होण्यासाठी या ठिकाणी भव्य अशी इमारत उभारण्यात आली आहे. मात्र इमारत धुळखात पडून आहे. भूकंप झाल्यानंतर सदरील ठिकाणी माहिती देण्यासाठी कुठलाही कर्मचारी किंवा अधिकारी उपस्थित राहत नाही. केवळ एक वॉचमन उपस्थित राहतो. ही भूकंपग्रस्तांची शोकांतिका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

Marathi News Live Updates : महाकाळा परिसरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT