ATM Broke sakal
मराठवाडा

ATM Theft : चोरट्यांनी एटीएम मशिन फोडून २६ लाख ८८ हजाराची रक्कम पळविली

स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या शाखेचे एटीएम मशिन फोडून चोरट्यांनी २६ लाखाची रोकड पळविली.

अविनाश काळे

उमरगा, जि. धाराशिव - तालुक्यातील बलसूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या शाखेचे एटीएम मशिन फोडून चोरट्यांनी २६ लाखाची रोकड पळविली. मंगळवारी (ता. २४) मध्यरात्री अडीचच्या सुमारास चोरीचा प्रकार घडला.

याबाबतची माहिती अशी की, बलसुर येथे एसबीआय बँकेचे एटीएम कार्यरत आहे, एनन्सीमार्फत एटीएममध्ये रक्कम भरली जाते. नागेश दत्तात्रेय कानुरे रा. उदगीर या खासगी नौकरदाराने एटीएममध्ये रक्कम भरलेली होती.

मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी एटीएम मशिनचे कॅश वॉल्ट गॅस कटरने कापुन त्यातील २६ लाख ८८ हजाराची रक्कम पळविली. अपर पोलिस अधिक्षक नवनीत काँवत, पोलिस निरीक्षक डी. बी. पारेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक एन. आर. गायकवाड, सुदर्शन कासार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

घटनास्थळी आलेले श्वानपथकातील श्वान त्याच ठिकाणी घुटमळले. गणेश कानुरे यांच्या तक्रारीनुसार बुधवारी (ता. २५) अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचे स्प्रे मारले!

चोरट्यांनी अगदी क्षणा, क्षणाचे नियोजन करून चोरीचे धाडस केले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद न होण्याची सावधगिरी बाळगत सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचे स्प्रे मारले. त्यामुळे कॅमेऱ्यात चोरट्यांची स्पष्टता दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mandangad Ghat Reopens : मुंबई, पुणे अन् महाडला जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! अखेर 'हा' महत्त्वाचा घाटमार्ग 4 दिवसांनंतर वाहतुकीसाठी खुला; मंडणगड-दापोलीचा संपर्कही पूर्ववत

Nagpur: नागपूर-बडनेरा रेल्वेमार्गावर ‘एबीएस सिस्टिम’; ऑटोमॅटिक सिग्नलिंगने वाढणार वेग; १७५ किमीचा मार्ग जानेवारीपर्यंत पूर्ण होणार

Latest Marathi News Live Update : जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा वारकरी जखमी

'मला त्या अदृश्य हातांची आठवण येतेय' किमोथेरिपी झाल्यानंतर मेधा मांजरेकरांची भावुक पोस्ट, म्हणाल्या...

Chhatrapati Sambhajinagar: म्हणे, मी त्याची पत्नी नाही; त्या खोलीत प्रवेशही नव्हता; बाबा फर्जन याच्या बंगल्यावरील कारवाई प्रकरणात अटकेतील महिलेचा एकाच दिवसात यू-टर्न

SCROLL FOR NEXT