Beed Beed
मराठवाडा

दुर्दैवी! मायलेकीसह पुतणीचा नदीपात्रात बुडून मृत्यू

गेवराई तालुक्यातील मिरगाव येथील दुर्दैवी घटना

वैजिनाथ जाधव

गेवराई (बीड): कपडे धुण्यासाठी आईसोबत गेलेल्या मुलीचा नदीकाठी खेळत असताना तोल गेल्याने तिला बाहेर काढण्यासाठी गेलेल्या आईचा व सोबत असलेल्या पुतणीचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना गेवराई तालुक्यातील मिरगाव येथे बुधवार सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. आईसह चिमुकल्यावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रंजना भागवत गोडबोले (वय 30), अर्चना भागवत गोडबोले (वय 10), शितल हनुमान गोडबोले (वय 11) अशी नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मिरगाव हे गोदावरी नदी काठी असलेले गाव आहे. दरम्यान रंजना गोडबोले ह्या नेहमीप्रमाणे बुधवार (ता.दोन) रोजी सकाळी कपडे धुण्यासाठी गोदापात्रात गेल्या होत्या. सोबत मुलगी व पुतणीही गेल्या होत्या. रंजना या धुणे धुण्यात व्यस्त असताना नदीकाठी खेळणारी मुलगी अचानक पाण्यात पडल्याने ती गोदापात्रात बुडू लागली.

यावेळी तिला वाचविण्यासाठी रंजना यांनी देखील गोदापात्रातील पाण्यात उडी मारली. दरम्यान गोदापात्रात धुणे धुणाऱ्या काही महिलांनी आरडा ओरड करत गावाकडे धाव घेऊन मदतीसाठी आवाहन केले. मात्र गावातील तरुण येईपर्यंत रंजना सह त्यांची मुलगी व पुतणीचा तीघीचा बुडून मृत्यु झाला. यानंतर या घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलीसानी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. तसेच तिघीचे मृतदेह तलवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून शवविच्छेदन करण्यात आले. घटनेचा पुढील तपास तलवाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Everest च्या हिंगच्या विक्रीवर तात्काळ बंदी! FSSAI च्या तपासणीत सॅम्पल फेल, आणखी एका कंपनीवरही कारवाई

Neeraj Chopra २०२६ वर्षात आता पुन्हा मैदानात दिसणार नाही, स्वत:च सांगितलं कारण; Asian Games आधी भारताला धक्का

Education Leader Passes Away: शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व डॉ. श्रीपाद ढेकणे यांचे निधन; विद्यार्थी चळवळ व राज्य शिक्षण धोरणात मोठे योगदान

Pune Cable Policy : पुणे महापालिकेचे दोन हजार कोटी वाचले; आयुक्तांच्या हस्तक्षेपामुळे वादग्रस्त केबल धोरण मागे

September Lucky Zodiac Signs: सप्टेंबर ठरणार 'या' 5 राशींसाठी लकी! 3 राजयोगांमुळे मिळणार पैसा, करिअर, व्यवसायात भरगोस यश

SCROLL FOR NEXT