Gevrai Gevrai
मराठवाडा

आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू

या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

वैजिनाथ जाधव

या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

गेवराई (बीड): आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्या बहिणींचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे शनिवार (ता. 28) ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गोदापात्रात घडली. नेहा धर्मराज कोरडे ( वय नऊ) वर्ष व अमृता धर्मराज कोरडे (वय आठ) वर्ष राहणार राक्षसभुवन (ता. गेवराई)अ से मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक भास्कर नवले यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन मुलींचे मृतदेह पाण्याबरोबर काढले.

तसेच घटनेचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र उमापुर येथे पाठविण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गेवराई तालुक्यात काही महिन्यापूर्वी देखील मिरगाव, संगमजळगाव येथे धुणे धुण्यासाठी गेलेल्या मुलींचे गोदावरी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झालेले आहे. त्यातच शनिवारी राक्षसभुवन याठिकाणी देखील घटना घडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT