उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक Sakal
मराठवाडा

उमरगा : जिल्हा बँकेस शासनाकडून मिळणार थकहमीची रक्कम

देवरा समिती व प्रा. सुरेश बिराजदार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक संपन्न

अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकहमी रकमेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे वित्त सचिव यांच्या अध्यक्षतेखाली देवरा समिती स्थापन करून अहवाल सादर करण्याचे सूचित केल्याने मंगळवारी (ता. २२) देवरा समिती समवेत बँकेचे मावळते अध्यक्ष तथा नवनिर्वाचित संचालक प्रा. सुरेश बिराजदार यांच्या उपस्थितीत मुंबईत मंत्रालयात आयोजित बैठकीत  बँकेला कॉस्ट व फंडनुसार थकहमीची रक्कम देण्याचे मान्य करण्यात आले आहे. (Osmanabad District Bank Updates)

जिल्हा बँकेस थकहमीची रक्कम मिळावी यासाठी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे संपर्कात राहून पाठपुरावा चालू ठेवला होता. या पाठपुराव्याला यश आले असून  अर्थमंत्री श्री. पवार यांनी राज्याचे वित्त सचिव यांच्या अध्यक्षतेखाली देवरा समिती स्थापन करून अहवाल सादर करणबाबत सूचित केले होते. त्यानुसार मंगळवारी देवरा समितीचे सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, एम. एस. सी. बँकेचे कार्यकारी संचालक अजित देशमुख यांच्या उपस्थितीत

झालेल्या बैठकीमध्ये प्रा. बिराजदार यांनी थकहमी मिळण्यासंदर्भात आवश्यक ती माहिती देऊन बँकेस थकहमीची रक्कम मिळण्यासंदर्भातील सविस्तर माहीती विषद केली. त्यानंतर बँकेस कॉस्ट व फंड नुसार रक्कम देण्याचे समितीने मान्य केले आहे. ही थकहमीची रक्कम बँकेस ३१ मार्च २०२२ अखेर पर्यंत मिळणार असल्याने बँकेला अनेक वर्षानंतर गतवैभव प्राप्त होण्यास मदत होणार आहे. प्रा. बिराजदार यांनी मागील चार ते पाच वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून पुढील काही महिन्यात बँक पूर्वपदावर येणार आहे. या बैठकीसाठी बँकेचे कार्यकारी संचालक विजय घोणसे- पाटील यांची उपस्थिती होती.

" जिल्हा बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मागच्या पाच वर्षात सातत्याने पाठपुरावा केला. तेरणा व तुळजाभवानी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याच्या निर्णयाचाही फायदा बँकेला होत आहे. थकहमीची मोठी रक्कम बँकेला मिळण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला आहे. ३१ मार्च अखेर थकहमीची रक्कम मिळेल.

- प्रा. सुरेश बिराजदार, माजी अध्यक्ष, नूतन संचालक जिल्हा बँक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फेक नॅरेटिव्हचा आरोप, राहुल गांधींवर निशाणा अन् CJPचा नवा अर्थ; फडणवीसांच्या भाषणात काय काय?

Railway Reservation : गणपतीसाठी १.१७ लाख प्रवाशांचे आरक्षण पूर्ण; मध्य रेल्वेच्या २६२ विशेष गाड्या, सावंतवाडी रोडसाठी सर्वाधिक ११२ सेवा

कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाचं भयंकर कृत्य, विद्यार्थ्यावर थेट तलवारीने वार; कल्याणमधील नामांकित कॉलेजजवळ रक्तरंजित थरार

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Local Time Table : पश्चिम रेल्वेवर उद्यापासून लोकलचे नवीन वेळापत्रक; सहा नवीन फेऱ्या, एसी लोकलची संख्या १४७

SCROLL FOR NEXT