नांदेडला अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणावर होत आहे  
मराठवाडा

‘या’ शहरात झालेय अनधिकृत बांधकामासह अतिक्रमणाकडे दुर्लक्ष

अभय कुळकजाईकर

नांदेड - नांदेड शहर झपाट्याने वाढत असल्यामुळे त्याच्यासोबत वेगवेगळ्या  अडचणीही वाढत चालल्या आहेत. वेगवेगळ्या भागातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत भागातील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढत चालले आहे. त्याचबरोबर शहरासह लगतच्या नगरांमध्येही मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असून त्यात अनधिकृत बांधकामांचे प्रमाण जास्त असून त्याकडे महापालिका प्रशासनासह पदाधिकारी, नगरसेवकांचेही दुर्लक्ष झाले आहे. 

वाहतुकीची कोंडी नित्याचीच
रोजगार, नोकरीच्या निमित्ताने ग्रामीण भागातील लोकांचे शहराकडे होत असलेले स्थलांतर, वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आदींमुळे शहरातील समस्या वाढत चालल्या आहेत. त्यातच अनेक ठिकाणी रस्त्यावरही अतिक्रमण वाढत चालल्याने त्याचा त्रास वाहनधारकांसह नागरिकांना होत आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे.

गांभीर्य नसल्याने अडचणीत भर
सध्या अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणावर होत असून त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावरही अतिक्रमण वाढले आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामेही सुरू आहेत. त्याकडेही संबंधित विभागाचे फारसे लक्ष नाही. थातूरमातूर कारवाई करून दुर्लक्ष करण्यात येत आहे. मंजूर नकाशाविरुद्ध अनेकांची बांधकामे सुरू आहेत. पदाधिकारी आणि नगरसेवकदेखील फारसे गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे.

आयुक्त वैद्यकीय रजेवर
अनेक ठिकाणी मोठमोठ्या इमारती उभ्या राहात आहेत आणि त्यासाठी पार्किंगची सोय करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयुक्तांनी लक्ष घालणे गरजेचे आहे; पण आयुक्त लहुराज माळी हे गेल्या ता. २४ डिसेंबरपासून वैद्यकीय रजेवर आहेत. त्यामुळे सध्या जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्यावर प्रभारी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी या बाबत लक्ष घालून गेल्या चार - पाच दिवसांत कामाचा धडाका लावत अनेक कामांचा निपटारा केला आहे.

पालकमंत्र्यांनी द्यावे लक्ष
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या बाबत लक्ष दिले असून आढावा बैठक घेऊन त्यांनी विविध कामांचा आढावाही घेतला आहे. आता अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणांकडे लक्ष देण्याची आणि कार्यवाही करण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली आहे.

क्षेत्रिय अधिकाऱ्यांवर जबाबदारी
अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांसह इतर विषयांवर प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी महापालिकेत बैठक घेतली. क्षेत्रिय अधिकारी तसेच नगररचना विभागातील इमारत निरीक्षक, अभियंता यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच अतिक्रमणांसंदर्भात अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे कारवाई करण्यात येत आहे. अनधिकृत बांधकामांसंदर्भात संबंधितांना महापालिकेतर्फे नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत, तर काहींना शास्ती (दंड) ही लावण्यात आल्याची माहिती उपायुक्त अजितपालसिंघ संधू आणि उपायुक्त विलास भोसीकर यांनी दिली.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Gold Investment: आज 50 हजारांचं सोनं घेतलं तर 10 वर्षांनी किती लाखांचं होईल? जाणून घ्या गणित

खंजिरीचे बोल! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कथा आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका, तुम्ही ओळखलंत?

Grahana Yoga 2026 : ग्रहण योग आणि अमावस्येचा भयानक संयोग; कोणत्या राशींवर होणार वाईट परिणाम? सूर्य-केतूच्या युतीनं 'या' लोकांचं वाढू शकतं टेन्शन

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT